27 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeराजकीयसाकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणावरून विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे. परंतु विरोधकांनी यावरून सरकारवर चिखलफेक करण्याच राजकारण करू नये असे राऊत म्हणाले (Sanjay Raut has expressed anger at the opposition over the Sakinaka rape case).

साकीनाका येथे झालेली घटना ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक आहे. तसेच, जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईच नाव वरच्या स्थानी आहे. परंतु अशा प्रकरणावरून राजकारण करू नका. अशा प्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात असे ही राऊत म्हणाले.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

मुंबई पोलिसांना पीडित महिलेचं स्टेटमेंट घेता आले असते तर, अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. परंतु, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुख्य आरोपीला अटक केली आहे. तसेच, आरोपीवर फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवण्याची मागणी करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही मागणी मान्य करतील असेही राऊत म्हणाले.

संजय राऊतांचे भाजपला आवाहन, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा

“Sanjay Raut’s Ego Defeated In Belgaum”: Devendra Fadnavis After Polls

मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्यात आली आहे. बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात महिलेची मृत्युशी झुंज अखेर संपली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी