29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमुंबईशरद पवार भावुक; दिलीप कुमारांसोबतच्या आठवणींना दिला उजळा

शरद पवार भावुक; दिलीप कुमारांसोबतच्या आठवणींना दिला उजळा

टीम लय भारी

मुंबई :- आज दिलीपकुमार यांनी वयाच्या 98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकुळ झाला आहे. आपल्या मित्राच्या जाण्याने शरद पवारही भावुक झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करत, दिलीपकुमार यांच्या सोबतच्या आठवणींना उजळा दिला आहे (Sharad Pawar has brightened the memories of Dilip Kumar).

दिलीप कुमार यांची लोकप्रियता किती होती आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्या काळात लोक किती धडपडायचे याचा दाखला शरद पवार यांनी स्वत:चे उदाहरण देऊन सांगितला आहे. दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करताना शरद पवार म्हणाले दिलीपकुमार आपल्यात राहिले नाहीत. पण माझ्या नजरेसमोर त्यांच्या अनेक आठवणी आहेत. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते. देशाने एक महानायक गमावला आहे.

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

उद्धव ठाकरेंनी दिलीपकुमारांना वाहिली श्रद्धांजली; रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला

पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. ‘मी शाळेत असताना पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या जेजुरी इथे ‘नया दौर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे असे आम्हाला कळले. हे कळताच शूटिंग बघण्यासाठी आम्ही सायकलवरून तिथे गेलो होतो. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहण्याची संधी मिळाली,’ असे पवारांनी सांगितले (I got a chance to see Dilip Kumar from afar said Pawar).

नंतरच्या काळात विधिमंडळात राज्य सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिलीप कुमार आणि माझी मैत्री झाली. आमचे वेगळे नाते निर्माण झाले. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते माझा प्रचार करण्यासाठी एखाद दुसरी सभा घ्यायचे, असे शरद पवारांनी सांगितले.

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

From Bal Thackeray to Sharad Pawar, Dilip Kumar shared strong bond with politicians

राजकारणाच्या व्यतिरित्त्कही मुंबईच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सहभाग असे. म्हणूनच त्यावेळच्या राज्य सरकारने त्यांची नियुक्ती मुंबईचे शेरीफ पदावर केली होती. त्यावेळी त्यांनी शेरीफ म्हणून त्यांनी चांगले काम केले होते, असेही त्यांनी सांगितले. भारत चीन युद्ध, भारत-पाक युद्धा नंतर जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, जनमाणसात एकसंघत्व निर्माण करण्यासाठी दिलीप कुमार यांनी संरक्षण यंत्रणांना नेहमीच सहकार्य केले होते असेही त्यांनी स्पष्ट केले. (He also clarified that Dilip Kumar had always cooperated with the defense establishment).

परदेशातही दिलीप कुमार लोकप्रिय होते. त्याची प्रचिती आम्हाला आली. आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती. इतके ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता भारतापुरतीच नव्हती, तर भारताबाहेरही ते लोकप्रिय होते, असे शरद पवार म्हणाले. अलिकडे दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नव्हती त्यांना मी भेटून आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली होती, असेही शरद पवारांनी सांगितले.

Sharad Pawar has brightened the memories of Dilip Kumar
दिलीप कुमार आणि शरद पवार

दिलीप कुमार यांच्या जाण्याने कलेवर, त्यांच्यावर अस्था असलेल्या घटकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असेल. पण त्यांना जे काही आयुष्य मिळाले त्यात त्यांनी कलेची अखंड सेवा केली. त्याबद्दल आपण कृतज्ञ राहणे हेच योग्य होईल, असे शरद पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी