28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयशरद पवारांनी मोदी - योगी सरकारवर ओढला आसूड

शरद पवारांनी मोदी – योगी सरकारवर ओढला आसूड

टीम लय भारी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवरील हिंसाचारावर जोरदार टीका केली. त्यावेळी ते म्हणाले, या प्रकरणावर केंद्र किंवा उत्तर प्रदेश सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच अपघाताबाबत केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे. (Sharad Pawar lashes out at Modi-Yogi government)

भाजप ची सत्ता असलेलं यूपी सरकार आणि केंद्र सरकार लखीमपूर खेरी हिंसाचारात शेतकऱ्यांच्या मृत्यूला पूर्णपणे जबाबदार आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण केवळ निषेध केल्याने आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. असे उद्गार माध्यमांशी बोलताना पवारांनी काढले.

वंचितांना मदत करून वाढदिवस साजरा, भाजप पदाधिकाऱ्याचे कौतुकास्पद कार्य

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

पुढे ते म्हणाले, चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी केली पाहिजे. दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी असावे. ही घटना केंद्र सरकारचा हेतू दर्शवते. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे ते शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही.

केंद्र सरकार आणि यूपी सरकार संवेदनशील नाहीत. लखीमपूर खेरीची अवस्था जालियनवाला बागेसारखी आहे. देशातील शेतकरी हे कधीच विसरणार नाहीत. सत्तेचा गैरवापर होतो. शेतकऱ्यांनो, तुमच्यावर हल्ला होऊ शकतो, पण आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत. अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

शरद पवार लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर संतापले, आणि म्हणाले…

शरद पवारांनी मोदी - योगी सरकारवर ओढला आसूड

Nitin Gadkari Has Shown How Power Can Be Used: Sharad Pawar

यावेळी त्यांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याविषयी सुद्धा आपले मत मांडले. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर निदर्शने करत आहेत. आंदोलन शांततेत सुरू आहे. तथापि, त्याच्यावर हल्ला झाला, ज्याची प्रतिक्रिया देशभरात पसरली. लोकशाहीत तुम्हाला शांततेने बोलण्याचा अधिकार आहे. असेही पवार आपल्या ट्वीटमधून म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी