28 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeसिनेमाशिल्पा शेट्टीचा सुपर डान्सरमध्ये कमबॅक

शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सरमध्ये कमबॅक

टीम लय भारी

मुंबई : १९ जुलै रोजी पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर 4 च्या सेटमधून ब्रेक घेतला होता. मात्र, आता तीन आठवड्याच्या गॅप नंतर शिल्पा शोमध्ये परतत आहे (Shilpa Shetty comeback in Super Dancer).

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये शिल्पा शेट्टीच्या जागेवर कधी सोनाली बेंद्रे तर कधी जेनेलिया-रितेश दिसले होते. दर आठवड्याला काही सेलेब्स शिल्पा शेट्टीची जागा घ्यायचे. पण आता निर्मात्यांना शिल्पाची जागा घेण्यासाठी कोणाचीही गरज भासणार नाहीय. ती आता या शोमध्ये परत आली आहे.

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कामात अडचणी

शिल्पा शेट्टीचाही पतीसोबत सहभाग आहे का?; पोलीसांनी केली सहा तास चौकशी

एका वृत्त संस्थाच्या रिपोर्टनुसार शिल्पा शेट्टीने पुढच्या आठवड्याच्या भागाचे शूटिंग आजपासून सुरू केले आहे. शिल्पा पहिल्या सीझनपासून या शोचे परीक्षण करताना दिसत आहे. निर्माते शिल्पाच्या परत येण्याची वाट पाहत होते आणि आता तिच्या जागी इतर सेलेब्स घेणे टाळायचे होते. एका सूत्राने सांगितले की, आम्हाला आनंद आहे की शिल्पाने शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. आशा आहे की या सीझनच्या अखेरीपर्यंत ती हा शो जज करेल (She will be judging the show until the end of this season).

तो पुढे म्हणाला की, शिल्पासाठी देखील हा एक अतिशय भावनिक निर्णय होता की, ती खूप धैर्याने परत येत आहे. शिल्पा पुनरागमन करत असल्याने निर्मात्यांना खूप आनंद झाला आहे आणि आता तिची बदली शोधण्याची गरज भासणार नाही.

 Shilpa Shetty comeback in Super Dancer
शिल्पा शेट्टी

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टींना इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून 3 लाखांचा दंड

Shilpa Shetty returns to Super Dancer 4 sets, gets emotional as she receives a warm welcome

शिल्पा शेट्टीसह अनुराग बासू आणि गीता कपूर या शोला जज करत आहेत. हा शो अनेक आश्चर्यकारक प्रतिभावान मुलांना पुढे आणतो. या शोमध्ये 8-10 वर्षे वयोगटातील मुले आहेत, जी त्यांच्या दमदार नृत्य कौशल्याने लोकांची मने जिंकत आहेत.

या दिग्गजांनी सांभाळली परीक्षणाची धुरा!

शिल्पा शेट्टीच्या अनुपस्थितीत संगीता बिजलानी, जॅकी श्रॉफ, टेरेन्स लुईस, सोनाली बेंद्रे, मौसमी चॅटर्जी आणि करिश्मा कपूर, जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख शोचा भाग बनले होते.

शो मस्ट गो ऑन’

पती राज कुंद्राच्या अटकेनंतरपासून ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ ची माजी परीक्षक शिल्पा शेट्टी ही घराबाहेरच पडलेली नव्हती. तर, सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीकडून सोनी टीव्हीशी कोणताही संवाद झालेला नव्हता. म्हणूनच ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हणत मेकर्स पाहुणे परीक्षक आणि गीता कपूर-अनुराग बासू यांच्यासमवेत हा शो पुढे शूट करत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी