35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाINDvsPAK : 23 ऑक्टोबरला भारत-पाक सामना होणार? हवामानासंबंधित मोठी अपडेट आली समोर

INDvsPAK : 23 ऑक्टोबरला भारत-पाक सामना होणार? हवामानासंबंधित मोठी अपडेट आली समोर

टीम इंडियाने सकाळी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पोहोचून सरावाला सुरुवात केली. क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की मेलबर्नमध्ये आज म्हणजेच शुक्रवारी (21 ऑक्टोबर) सकाळपासून पाऊस पडला नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्ध या महान सामन्यासाठी मेलबर्नला पोहोचून तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाने सकाळी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पोहोचून सरावाला सुरुवात केली. क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की मेलबर्नमध्ये आज म्हणजेच शुक्रवारी (21 ऑक्टोबर) सकाळपासून पाऊस पडला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये भारतीय खेळाडू मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसत आहेत. बीसीसीआयने फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी आमच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रासाठी आलो आहोत. यापूर्वी ब्रिस्बेनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. भारतीय संघ गुरुवारी मेलबर्नला पोहोचला.

टीम इंडिया संध्याकाळी नेटमध्ये घाम गाळणार आहे
टीम इंडिया शुक्रवारी मेलबर्नमध्ये दोन सत्रांसाठी सराव करणार आहे. सकाळी, संघाचे कंडिशनिंग सत्र ठेवण्यात आले आहे, तर संध्याकाळी भारतीय संघ MACG येथे नेटमध्ये सराव करेल. भारतीय क्रिकेट संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. याआधी गुरुवारी टीम इंडिया पहिल्या सामन्याच्या तीन दिवस आधी मेलबर्नला पोहोचली होती.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : ‘एमएमआर’मधील विविध विकास कामे वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

TATA Motors : 12वीचे शिक्षण झालेल्यांना टाटा मोर्टसमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! वाचा काय आहे योजना

रोहित-सूर्यकुमार आणि भुवी कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत
भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर मेलबर्नला पोहोचल्याची माहिती दिली. चहलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, राखीव वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये सर्वजण फ्लाइटच्या आत दिसत होते. सूर्यकुमार यादवनेही रोहित शर्माची मुलगी अदारासोबतचा फोटो अपलोड केला आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात स्टोडियमवर किंवा परिसरात पाऊस पडला नसला तरीही 23 ऑक्टोबर रोजी पाऊस पडण्याची 70 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही याबाबत अजूनही उत्सुकताच आहे. जर या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास सामन्यांतील षटकांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, असे झाले तरीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा रोमांचत कमी होणार नाही याची पूर्ण शाश्वती आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी