35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाचाहत्यांच्या निशाण्यावर हार्दिक पांड्या, आता कॅमेऱ्यात कैद झाली MI कर्णधाराची 'हि' कृती, पहा...

चाहत्यांच्या निशाण्यावर हार्दिक पांड्या, आता कॅमेऱ्यात कैद झाली MI कर्णधाराची ‘हि’ कृती, पहा व्हिडिओ 

5 वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची (Mumbai Indians) या हंगामात सुरुवात चांगली नाही झाली आहे. हा हंगाम सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत होती. IPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. (IPL 2024 fans shouting rohit rohit hardik pandya this act caught on camera) हे चाहत्यांना काही आवडलं नाही.

5 वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची (Mumbai Indians) या हंगामात सुरुवात चांगली नाही झाली आहे. हा हंगाम सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत होती. IPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. (IPL 2024 fans shouting rohit rohit hardik pandya this act caught on camera) हे चाहत्यांना काही आवडलं नाही.

लाईव्ह सामन्यादरम्यान रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुलीने घातला अंपायरसोबत वाद

त्यानंतर मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंतच्या त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याला स्टेडियममध्ये जोरदारपणे ट्रोल करण्यात आले, तर रोहित शर्माला जोरदार पाठिंबा दिसला. यातच आता हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ लीक झाला आहे, ज्यामध्ये त्याची एक कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (IPL 2024 fans shouting rohit rohit hardik pandya this act caught on camera)

‘रोहितला कर्णधारपदावरून काढणे म्हणजे…’, मायकल वॉनने मुंबई इंडियन्सला सुनावले

सोशल मीडियावर एक छोटीशी व्हिडिओ क्लिप शेअर केली जात आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या काही वेळ आकाश अंबानीशी बोलताना दिसला, त्यानंतर जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये परत जाऊ लागला तेव्हा स्टेडियममधील चाहत्यांनी रोहित-रोहित असा आरडाओरडा सुरू केला. मात्र, हार्दिकला हे आवडला नसेल, त्याचमुळे त्याने ड्रेसिंग रूमकडे जाताना स्टेडियममधील कुंपणावर हात मारला. हार्दिकची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून आता हा लीक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक हार्दिकच्या या कृतीवर प्रश्न देखील विचार आहेत.  (IPL 2024 fans shouting rohit rohit hardik pandya this act caught on camera)

जुन्या अवतारात दिसला रोहित शर्मा, SRH विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्याला दिला ‘ऑर्डर’

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जसप्रीत बुमराहला सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करू न देणे, हार्दिक स्वत: फलंदाजीच्या क्रमाने उतरणे आणि गरज असेल तेव्हा वेगवान फलंदाजी करू न शकणे… अशा गोष्टींसाठी त्याच्यावर बरीच टीका होत आहे. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला, तर सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला.(IPL 2024 fans shouting rohit rohit hardik pandya this act caught on camera)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी