35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्यापार-पैसानाशिक मनपामध्ये मालमत्ता कर १४ कोटी तर पाणीपट्टीचे ३८ कोटी थकबाकी

नाशिक मनपामध्ये मालमत्ता कर १४ कोटी तर पाणीपट्टीचे ३८ कोटी थकबाकी

आयुक्तांनी करसंकलन विभागाला २१० कोटीचे उद्दिष्ट दिले होते. पण आजमितीला मालमत्ता कराच्या < Tax > वसुलीचा गाडा १९६ कोटीवर अडकला असून उद्दिष्टापैकी अद्यापही चौदा कोटी मागे आहे. तर पाणीपट्टीच्या ७५ कोटीच्या उद्दिष्टापैकी ५१ कोटीची वसुली झाली असून अद्याप २४ कोटींची थकबाकी आहे. मार्च अखेरला अवघे तीन दिवस शिल्लक असून मालमत्त्ता व पाणीपट्टीचे तब्बल ३८ कोटी वसुलीसाठी दमछाक होत आहे.तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी मनपा हद्दित २०१८ पासून करयोग्य मूल्यदरात पाच ते सहा पटीने वाढ करीत नाशिककरांवर अवाजवी घरपट्टी लादली होती. निवासी व अनिवासी, तसेच वाणिज्य अशा प्रकारची वर्गवारी रद्द करून निवासी आणि अनिवासी अशी दोन प्रकारे वर्गवारी केली होती. (Nashik Municipal Corporation owes Rs 14 crore in property tax and Rs 38 crore in water tax)

हा मुद्दा न्यायालयातही गेला असून सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने मुख्यमंत्री शिंदे यांनी दरवाढीचा ठराव खंडित करावा अशी मागणी केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी करवाढ पुर्नमुल्यांकनाचे आदेश दिले होते. यानंतर मात्र शहरातील नागरिकांना सरसकट मालमत्ताधारकांना लाभ मिळेल. असा संदेशे गेल्याने याचा फटका मनपाला बसला. दरम्यान ३१ मार्च पर्यत मालमत्ता कर वसुलीचा आकडा दोनशे पार होण्याची शक्यता आहे. परंतु मालमत्ता करासह पाणीपट्टीची वसुली करायची असल्यास दिवसाला बारा कोटी रुपये वसुली करावीच लागणार आहे.

प्रतिक्रिया
थकबाकीप्रकरर्णी महापालिका इको बॅकेवर कारवाइ करत आहे. शहरातील मालमत्त्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदारांनी सहकार्य करुन थकबाकी भरावी. शासकीय कार्यालयाकडून देखील थकबाकी वसुल केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ३१ मार्च पूर्वी थकबाकी भरुन मनपाला सहकार्य करावे. तसेच थकबाकी न भरल्यास दंडात्मक कारवाइ करण्यात येइल.तसेच थकबाकी न भरल्यास दंडात्मक कारवाइ करण्यात येइल.

-विवेक भदाणे, प्रभारी कर संकलन विभाग, मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी