28 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeक्रीडाकेवळ 1 बळी… आणि कानपुरमध्ये अनोखा विक्रम रुचणार रवींद्र जडेजा!

केवळ 1 बळी… आणि कानपुरमध्ये अनोखा विक्रम रुचणार रवींद्र जडेजा!

आर अश्विनने भारतासाठी पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. तर रवींद्र जडेजाने 86 धावांची खेळी केली. यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात 6 तर जडेजाने दोन्ही डावात एकूण 5 बळी घेतले. (ravindra jadeja historic milestone just one wickets)

भारत आणि बांगलादेश यांच्या दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारत ने कसोटीचा पहिला सामना जिंकला असून, दुसरा सामना 27 सप्टेंबरला कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील 179 वा विजय नोंदवला. (ravindra jadeja historic milestone just one wickets)

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारताच्या या विजयात फिरकी जोडी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जोडीने धडाकेबाज काम केले. या दोघांनी चेंडू आणि फलंदाजी दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी केली. आर अश्विनने भारतासाठी पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. तर रवींद्र जडेजाने 86 धावांची खेळी केली. यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात 6 तर जडेजाने दोन्ही डावात एकूण 5 बळी घेतले. (ravindra jadeja historic milestone just one wickets)

जडेजाने बांगलादेशच्या पहिल्या डावात 2 फलंदाज परत पाठवले आणि नंतर दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. जडेजाला आणखी एक विकेट घेण्यात यश मिळाले असते तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला असता. मात्र, आता त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचण्याची मोठी संधी असेल. (ravindra jadeja historic milestone just one wickets)

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात जडेजाने विकेटचे खाते उघडताच तो कसोटी क्रिकेटमधील 300 बळी पूर्ण करेल. अशाप्रकारे, तो कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा आणि 300 बळींचा दुहेरी पूर्ण करणाऱ्या निवडक क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील होईल. (ravindra jadeja historic milestone just one wickets)

आतापर्यंत केवळ 10 क्रिकेटपटूंनी 3000 धावा केल्या आहेत आणि 300 हून अधिक बळी घेतले आहेत. यामध्ये केवळ 3 फिरकीपटूंचा समावेश आहे. अशा स्थितीत जडेजाला चौथा फिरकीपटू म्हणून या क्लबमध्ये प्रवेश करण्याची मोठी संधी असेल. (ravindra jadeja historic milestone just one wickets)

कसोटीत 3000 धावा आणि 300 बळी घेणारे क्रिकेटपटू

  • कपिल देव (भारत) – 5248 धावा आणि 434 विकेट्स
  • इयान बोथम (इंग्लंड) – 5200 धावा आणि 383 विकेट्स
  • डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड) – 4531 धावा आणि 362 विकेट्स
  • इम्रान खान (पाकिस्तान) – 3807 धावा आणि 362 विकेट्स
  • शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) – 3781 धावा आणि 421 विकेट्स
  • स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 3662 धावा आणि 604 विकेट्स
  • रविचंद्रन अश्विन (भारत) – 3422 धावा आणि 522 विकेट्स
  • शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 3154 धावा आणि 708 विकेट्स
  • रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड) – 3124 धावा आणि 431 विकेट्स
  • चामिंडा वास (श्रीलंका) – 3089 धावा आणि 355 विकेट्स

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याच्या नावावर 73 कसोटी सामन्यांमध्ये 3122 धावा आहेत. यामध्ये 4 शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत 23.98 च्या सरासरीने 299 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी