33 C
Mumbai
Thursday, May 11, 2023
घरक्रीडाअखेर दुष्काळ संपला! दिर्घकाळानंतर विराटने झळकावले कसोटी शतक

अखेर दुष्काळ संपला! दिर्घकाळानंतर विराटने झळकावले कसोटी शतक

सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने शानदार शतक झळकावले. गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली कसोटी शतकापासून दूर राहिला होता. अखेर त्याच्या कसोटी शतकांचा दुष्काळ आता संपला असल्याचे दिसत आहे.

सध्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चोथा सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने शानदार शतक झळकावले. गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली कसोटी शतकापासून दूर राहिला होता. अखेर त्याच्या कसोटी शतकांचा दुष्काळ आता संपला असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाला सामना जिंकणे आवश्यक असताना विराटने एक विशेष खेळी करत भारताचा डाव सावरला आहे.

हे सुद्धा वाचा

अवॉर्ड फंक्शनमधून ‘रेड कार्पेट’ गायब! ऑस्करची 62 वर्षांची परंपरा बदलणार

रिक्षावर लोखंडी पाईप पडला अन् माय-लेकाने जीव गमावला! मुंबईतील दु:खद घटना

INDvsAUS : चौथ्या कसोटीत कोहलीचा ‘विराट विक्रम!’ ब्रायन लाराला पछाडत रचलाय धावांचा डोंगर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामना सर्व भारतीय चाहत्यांसाठी खूप खास बनला आहे. खरे तर या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट कोहलीने आपल्या 28व्या कसोटी शतकाची प्रतीक्षा अखेर संपवली. कोहलीने 241 चेंडूत हे शतक पूर्ण केल्यामुळे त्याने आता सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत हसिम आमला आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यांच्याशी बरोबरी केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 75 वे शतक आहे.

2022 साली विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून जवळपास 2 वर्षांनंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ संपवला. यानंतर, कोहलीने गेल्या वर्षाच्या अखेरीस खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये शानदार शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील कोहलीचे हे 8 वे शतक आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये, विराट कोहलीने त्याची शेवटची शतकी खेळी बांगलादेशविरुद्ध 2019 मध्ये ईडन गार्डन्स मैदानावर खेळली, ज्यामध्ये त्याने 136 धावांची शानदार खेळी खेळली. यानंतर आता 40 डावांनंतर त्याला कसोटी फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात यश आले आहे.

भारतातील 50 व्या कसोटीत 4000 धावा पूर्ण केल्या
हा कसोटी सामना विराट कोहलीसाठीही अनेक अर्थाने खास बनला आहे, ज्यामध्ये तो भारतात आपला 50 वा कसोटी सामना खेळत आहे आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यानंतर त्याने मायदेशात 4000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. 5वा भारतीय खेळाडू ठरला.

त्याचवेळी, या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 25000 आंतरराष्ट्रीय धावा देखील पूर्ण केल्या, ज्यानंतर तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 6 व्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीचे 2023 मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे, याआधी तो एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 2 शतके झळकावण्यात यशस्वी झाला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी