29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र६३ हजार संपकरी एसटी कर्मचारी वेतनापासून राहणार वंचित

६३ हजार संपकरी एसटी कर्मचारी वेतनापासून राहणार वंचित

टीम लय भारी

मुंबई : संपावर ठाम असलेल्या तसेच गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनाला मुकावे लागणार आहे. आज, शुक्रवारी ७ जानेवारीला एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवे वेतन जमा होईल. मात्र उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनाच वेतन मिळणार असून संपात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा वेतन मिळणार नाही(ST workers, 63000 Strikers will be deprived of salary).

एकूण ८८ हजार ३४७ कर्मचाऱ्यांपैकी निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती केलेले कर्मचारी आणि संपात सध्या सामील असलेल्या ६३ हजार ७०७ कर्मचाऱ्यांना नव्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

NEET-PG :‘नीट-पीजी’बाबत आज निकाल

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील थिएटर, मॉल्स बंद करणार का?

दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई केल्यानंतरही या कारवाया मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्यापूर्वी ७ डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढही लागू केली. परंतु सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची मागणी करून कर्मचारी संपावर ठाम राहिले. त्यामुळे अनेक कर्मचारी वेतनाला मुकले.

कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या ७ तारखेला होते. दुसरे वेतन खात्यावर जमा होण्याची वेळ आली, तरीही मोठय़ा प्रमाणात एसटी कर्मचारी अद्यापही संपावर आहेत. दोन महिन्यांत काही कर्मचारी निवृत्त झाल्याने सध्या एसटीतील एकूण कर्मचारी संख्या ८८ हजार ३४७ झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप गिरणी कामगारांच्या संपाच्या मार्गाने जावा : पडळकर

With strike entering 71st day, MSRTC to hire retired drivers

यात २४ हजार ६४० कर्मचारी कर्तव्यावरच हजर झाले आहेत. तर ६३ हजार ७०७ कर्मचारी कामावर हजर न झाल्याने त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. निलंबित कर्मचारी ११ हजार २४ असून बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ५१३ आहे, तर बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेले कर्मचारीही ३,५९३ आहेत. याशिवाय रोजंदारीवरील सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचीही संख्या सुमारे दोन हजार आहे. आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी