30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeराजकीयMCD निवडणूकीतील पराभवानंतर दिल्ली भाजप अध्यक्षांचा राजिनामा

MCD निवडणूकीतील पराभवानंतर दिल्ली भाजप अध्यक्षांचा राजिनामा

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत नुकत्याच झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत नुकत्याच झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आदेश गुप्ता यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे पाठवला आहे. यानंतर जेपी नड्डा यांनी आदेश गुप्ता यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

आदेश गुप्ता यांनी दिल्ली भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी वीरेंद्र सचदेवा कार्याध्यक्ष असतील. भाजपने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार आदेश गुप्ता यांचा दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. दिल्ली भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची पुढील सूचना येईपर्यंत कार्यवाहक प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होईल. विशेष म्हणजे आदेश गुप्ता यांना 2 वर्षांपूर्वी दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे मनमुराद ढोल वादन

खडसे यांच्या पत्नी पराभूत; जळगाव दूध संघात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण विजयी 

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी, महाजन यांचे पीए जळगाव दूध संघात विजयी; खडसे-महाजन यांची प्रतिष्ठा पणाला!

दिल्ली MCD निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या
2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर, मनोज तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांना दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. आदेश गुप्ता यांनी 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे राजीनामा पाठवला होता, त्यावर रविवारी निर्णय घेण्यात आला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. आता पुढील आदेश येईपर्यंत वीरेंद्र सचदेवा दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. एमसीडी निवडणुकीत आम आदमी पक्षाने 134 जागा जिंकल्या आहेत. तर 104 प्रभागात भाजपने बाजी मारली आहे. याशिवाय काँग्रेसचे 9 आणि इतर उमेदवार 3 प्रभागात विजयी झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी