31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयमोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी कारवाईला वेग

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी कारवाईला वेग

टीम लय भारी 

मुंबई : खासदार मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेली या लोकसभा मतदारसंघातून तब्बल ७ वेळा निवडून आले. त्यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पाटील यांचे नाव मुख्य आरोपींमध्ये आहे. खेडा पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मर्जीतले. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्याची हिंमत कोणी करीत नसे. मात्र भाजपच्या केंद्रीय तपास यंत्रणांना शह देण्यासाठी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांच्या रूपाने आपली वाघनखे बाहेर काढली आहेत.

मुंबई पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने प्रफुल्ल खेडा पाटील यांच्यासह इतरही सात आरोपींचा सलग दोन दिवस जबाब लिहून घेतला आहे, त्यामुळे तपासाला अधिक वेग मिळाला आहे. पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी अत्यंत धाडसाने हे पाऊल उचलले आहे.

︎खासदार मोहन डेलकर यांनी त्यांची आत्महत्या ही त्यांच्या मतदारसंघात न करता महाराष्ट्रातील मुंबईत येवून केली. महाराष्ट्र्रात बिगर भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे व तेच मला किमान माझ्या आत्महत्येनंतर न्याय देईल, असा त्याचा ठाम विश्वास होता. हे त्यांनी आत्महत्येपूर्वी गुजराती भाषेत लिहिलेल्या १५ पानी सुसाईड नोटमधून स्पष्ट होते.

︎ त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मुंबई पोलिसांच्या अधिकाराखाली विशेष पथक नेमले होते. मात्र त्यांची प्रक्रिया जवळपास थांबल्यासारखीच होती. या आत्महत्येच्या आरोपींमध्ये मोदी शाह यांच्या मर्जीतले मानले जाणारे प्रफुल्ल खेडा –  पटेल यांचे मुख्य नाव आहे. प्रफुल्ल खेडा पटेल हे गुजरातचे राज्य गृहमंत्री होते. सोयराबुद्दीन मर्डर केसमध्ये अटक झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अमित शहा याना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर लगेचच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रफुल्ल खेडा – पटेल यांची गृहमंत्री पदी नियुक्ती केली. त्यानंतर ते विधानसभेची निवडणूक हरले, तरीही त्यांना दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक म्हणून नेमले. यावरून ते मोदी- शहा यांच्या किती मर्जीतले होते, ते दिसून येते.

याच प्रफुल्ल खेडा पाटील यांचा डेलकर याना प्रचंड मानसिक त्रास होत होता. त्यांना डेलकर यांचे मेडिकल कॉलेज हडप करायचे होते, त्यांनी आदिवासी भवनही उद्ध्वस्त केले, त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीसांकडून नाहक त्रास दिला जायचा, असे आरोप डेलकर यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी