35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराजकारण हा पिंड नाही...अमोल कोल्हेंच्या त्या ट्विटने वेधलं सर्वांचे लक्ष

राजकारण हा पिंड नाही…अमोल कोल्हेंच्या त्या ट्विटने वेधलं सर्वांचे लक्ष

लोकसभा निवडणुक (lok sabha election) जसजशी जवळ येत आहे तस तसं राज्यातील वातावरण तापताना दिसत आहे. अशातच अमोल कोल्हे (Amol kolhe) यांचे ट्विट चर्चेत आलं आहे. शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. ही लढत अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. अशातच एकमेकांसमोर उभा ठाकलेले अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव यांची शिवनेरी गडावर भेट घडली. यावेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. इतकंच नव्हे तर अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले आणि हेज क्षण अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.(Amol Kolhe And Shivajirao Adhalrao Patil Meet At Shivneri Fort )

आज सकाळी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव शिवनेरी गडावर शिवरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. दरम्यान दोघांची भेट रस्त्यात झाली. आढळराव पाटील समोर येताच अमोल कोल्हेंनी थेट वाकून आढळराव पाटलांना नमस्कार केला. त्यानंतर दोघांमध्ये हसत गप्पा झाल्या आणि हस्तांदोलन करुन दोघेही मार्गस्त झाले.

दोघांचे हे क्षण कॅमेरात टिपले गेले. याच क्षणाचा व्हिडीओ कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला अन् राजकारण हा पिंड नाही…”शिवसंस्कार” हाच आमचा पिंड ! अशी कॅप्शन दिली. त्यांच्या या कॅप्शनने आणि ट्विटने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघाची मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली. त्यात आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि त्यांना आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आजच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात उभे असलेले अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, असा निर्धार अजित पवारांनी घेतला आहे. त्यामुळे या मतदार संघात अजित पवारांना चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी