32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीय'अजितदादा दोन हाणा, पण आपला म्हणा'; कार्यकर्त्याचा जाहिरातीमधून माफीनामा

‘अजितदादा दोन हाणा, पण आपला म्हणा’; कार्यकर्त्याचा जाहिरातीमधून माफीनामा

महेश कातुरे, टीम लय भारी

मुंबई :- अजित पवार हाय हाय, अजित पवार मुर्दाबाद. जो पवार साहेबांबरोबर गदारी करणार त्याच्या सोबत आमची नाराजी कायम असणार, हया घोषणाने वाय बी सेंटरचा परिसर हादरून गेला होता. या घोषणा अनेक वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून अख्या महाराष्ट्राने ऐकल्या आहेत. ही घोषणा ज्यांनी दिली ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख हे होते (Apology from Ajit Dada activist advertisement).

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने दादांना शुभेच्छा देत वृत्तपत्रातुन जाहीर माफी मागितली आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 1 रूपये दराने पेट्रोल वाटप

अजितदादा हे जनतेच्या मनातील ‘दादा’ : दत्तात्रय भरणे

“दोन हाना, पण मला आपलं म्हणा”

दादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने वर्तमानपत्रातून जाहीर माफीच मागीतली आहे. अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी नितिन देशमुख यांनी दादांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर अजितदादा हे नितिन देशमुख यांच्यावर नाराज होते. घोषणाबाजीनंतर ते आतापर्यंत देशमुख यांच्याशी अजितदादा बोलले नाहीत (He has not spoken to Deshmukh since the announcement).

नितिन देशमुख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तसेच पवार कुटुंबियांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. नेहमीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. पवारांविरुद्ध बोलणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना देशमुख नेहमीच अंगावर घेत आले आहे.

Apology from Ajit Dada activist advertisement
अजित पवार

रोहित पवारांनी अजितदादांचा खास गुण सांगत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Maharashtra: Ajit Pawar says fully vaccinated people should be allowed to go out

नेमके जाहिरातीत काय म्हटलंय

आदरणीय दादा…

आम्ही अपराधी अपराधी

आम्हां नाही दृढ बुद्धी

तरी साहेबी पांघरले माझ्या चुकांवर पांघरूण

हात ठेवुनी मस्तकी आता दयावा आशीर्वाद

अन असावी आम्हावर मायेची पखरण

आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी वृत्तपत्रातून जाहिरातबाजी करत माफी मागितली आहे. जाहीरात मध्ये शेवटी ते म्हणाले “मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट” आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी