30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
HomeराजकीयJaykumar Gore | आमदाराने आम्हाला दारू, मटण देवून लाचार बनविले |

Jaykumar Gore | आमदाराने आम्हाला दारू, मटण देवून लाचार बनविले |

जयकुमार गोरे यांनी अनेक समाजकंटकांना सोबतीला ठेवले आहे(Jaykumar Gore | The MLA made us helpless by giving us alcohol and mutton). गोरे यांच्या पक्षातर्फे काम करणारे अनेकजण वाळू माफिया म्हणून काम करीत आहेत. दीपक बनगर, किरण जाधव असे अनेकजण आहेत, जे माणगंगा नदीतून वाळू उपसा करीत आहेत

जयकुमार गोरे यांनी अनेक समाजकंटकांना सोबतीला ठेवले आहे(Jaykumar Gore | The MLA made us helpless by giving us alcohol and mutton). गोरे यांच्या पक्षातर्फे काम करणारे अनेकजण वाळू माफिया म्हणून काम करीत आहेत. दीपक बनगर, किरण जाधव असे अनेकजण आहेत, जे माणगंगा नदीतून वाळू उपसा करीत आहेत. हा वाळू उपसा करताना त्यांनी नदीपात्राच्या बाहेर जावून जमीन पोखरून काढली आहे. शेताला भगदाडे पाडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. महादेव कलढोणे नावाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या. पण प्रांत, तहसिलदार, पोलीस दखल घेत नाहीत. वाळू माफियांना आर्थिक दंडाच्या नोटीसाही पाठवल्या आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे शेतकऱ्यांनी ‘लय भारी’ला सांगितले.

जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

आमदार जयकुमार गोरे हे संविधानाला अभिप्रेत असा कारभार करीत नाहीत. वाळू माफियांसारखे समाजकंटक उघडपणे त्यांचे काम करीत असतात. जयकुमार गोरे यांचे दररोज एकेक कारनामे समोर येत आहेत. राज्य सरकारचे ‘गाळयुक्त शिवार अभियान’ ही योजना आहे. या योजनेनुसार 10 ऑगस्ट रात्रीपर्यंत म्हसवड जवळ असलेल्या राजवाडी धरणातून गाळ उपसण्याची परवानगी होती. 10 ऑगस्ट रोजी ची मुदत संपलेली आहे. लय भारी ने 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता राजवाडी धरणात धडक दिली. या ठिकाणी माफिया बेकायदेशीरपणे बिन धडकने गाळ उपसणे आढळले. पोकलेन, जेसीबी, डंपर, ट्रॉली अशी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी वरचढ

यावेळी स्थानिक नागरिकांनी यांनी गाळमाफिया आणि पोलीस महसूल खाते यांच्यात कसे साटे लोटे आहे हे सांगितले. या माफी यांच्या मुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. गाळमाफी यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. माफिया शेतातील गाळ बिनधास्तपणे उपसत आहे गाळ शेतकऱ्यांसाठी दिला जात नाही त्याऐवजी तो वीटभट्ट्यांना वापरला जातो. शेतकऱ्यांचे नाव हित मात्र माफियांचे असे धोरण स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी