34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमुस्लिमांबाबत जपून बोलत जा ! मोदींचा भाजप नेत्यांना सल्ला

मुस्लिमांबाबत जपून बोलत जा ! मोदींचा भाजप नेत्यांना सल्ला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धार्मिक सलोखा (Religious reconciliation) राखण्याचा सल्ला दिला आहे. मुस्लिमांबाबत बोलताना तारतम्य ठेवण्यास नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगितले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उपदेश करण्यात आला आहे. भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. ते म्हणाले,”मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधाने अजिबात करू नका. भारत सध्या सर्वोत्तम काळाचा अनुभव घेत आहे. अशात आपण मेहनतीच्याबाबतीत मागे पडता काम नये. लोकांच्या भेटीगाठी घ्या, राष्ट्रवादाची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत राहिली पाहिजे.” (Be careful when talking about Muslims! Modi’s advice to BJP leaders)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीय जनता पक्ष आता केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक चळवळ बनली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे सामाजिक आंदोलनात परिवर्तन झाले पाहिजे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. ते म्हणाले, संपूर्ण ताकदीने तयारीला लागा, मेहनतीत आपण कुठेही मागे पडता काम नये.

हे सुद्धा वाचा

Narendra Modi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट ?; मुंबई पोलिसांना ऑडिओ मेसेज

PM Narendra Modi : पाकिस्तानातील राजकिय पेचप्रसंगासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार! पीटीआयचा आरोप

PM Narendra Modi : हे सरकार गोरगरीबांना हालअपेष्ठांमध्ये सोडणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

 

सीमेलगतच्या गावांमध्ये संघटन मजबूत करा
सीमेलगतच्या गावांत भाजपचा प्रभाव वाढवा यासाठी सीमेलगतच्या गावांमध्ये संघटन आणखी मजबूत करण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे. सीमेलगतच्या गावांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज यावेळी मोदींनी बोलून दाखविली. निवडणुकीला अद्याप ४० दिवस शिल्लक आहेत. आपल्याला आपले प्रयत्न आणखी वाढवले पाहिजेत असे ते म्हणाले.

चित्रपटांवर उलट सुलट भाष्य करण्यापेक्षा कामावर लक्ष द्या !
नरेन्द्र मोदी यांनी आपल्या नेत्यांना चित्रपांवर उलटसुलट भाष्य करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष करण्यास सांगितले आहे. ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून भाजपच्या काही नेत्यांनी गदारोळ केला होता. त्यांना मोदी यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. ते म्हणाले,”काही जण चित्रपटांबद्दल अनावश्यक भाष्य करतात त्यामुळे दिवसभर त्या विषयाची माध्यमांमध्ये चर्चा होत राहते. त्यामुळे नेत्यांनी अशी वक्तव्ये करण्यापासून दूर राहिलं पाहिजे,” भाजपाचे आमदार राम कदम यांनी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून दिग्दर्शकांना इशारा दिला होता. राम कदम म्हणाले होते की, राज्यात सध्या हिंदुत्वाची विचारधारा मानणारे सरकार आहे. साधू-संतांनी घेतलेल्या आक्षेपांबाबत चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी. राज्यात हिंदुत्वाचा प्रमाण करणारा कोणताही चित्रपट अथवा मालिका चालू देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी