28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱ्यावर भाजपचा सवाल

मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱ्यावर भाजपचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादेत ध्वजारोहण संपन्न होणार आहे. परंतु, मराठवाडा दौऱ्यावर जाण्याआधी मुख्यमंत्र्यांनी तेथील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे (BJP question on CM Marathwada tour).

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्याप सरकारने  पंचनामे काढले नसून विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केलेले नाही.  या अतिवृष्टीत ८०० मुकी जनावरे वाहून गेली तर २५ पेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून तिथे ढगफुटी झाली.

धर्मनिरपेक्ष पक्षांचा जातीयवादी चेहरा उघड, जिल्ह्यावासीयांसमोर बुरखा फाटला

मुख्यमंत्रीपदासाठी ४ नेत्यांची नावे

सोयाबीन, कापूस, तीळ, मुंग, उडीद, व ऊस इत्यादी पिकांच्या उत्पादनातही प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड, इत्यादी भागात पावसामुळे शंभर टक्के लोकांचे संसार उध्वस्त झाले. असे   भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले.

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

Saki Naka rape-murder case: Maharashtra CM Uddhav Thackeray promises fast-track trial and ‘severe punishment’

मराठवाडा मुक्ती दिन 

१७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला होता. निजामाच्या जुलमातून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तसेच या दिवशी औरंगाबाद येथे ध्वजारोहण करण्यात येथे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी