28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयबीएमसीमध्ये राजकीय 'प्रदूषण'; ठाकरे-शेलार आमने-सामने

बीएमसीमध्ये राजकीय ‘प्रदूषण’; ठाकरे-शेलार आमने-सामने

राजकारणात सत्तासंघर्षावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. एवढेच नाही तर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष काका-पुतणे, भाऊ-बहीण यांना राजकीयदृष्ट्या विरोधकांच्या भूमिकेत बसवत आहेत. दरम्यान, राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून हे शहर मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. एक देश आणि एकच सरकार असा भाजपाचा हट्टहास आहे. यासाठी अनेक वर्षे मुंबईवर शिवसेना उद्धव ठाकरेंचे सरकार होते. मात्र ही मुंबई मिळवण्यासाठी आगामी निवडणुकांचा वेध घेऊन भाजप आता शिवसेना ठाकरे गट या पक्षाला टार्गेट करत आहे. भाजपचे नेते डॉ. आशिष शेलारांनी मुंबईच्या प्रदुषणाबाबत आदित्य ठाकरेंना सुनावले आहे.

काय म्हणाले डॉ. आशिष शेलार?

अनेक वर्षांपासून ठाकरे गटाकडे मुंबई महापालिकेची सत्ता आहे. यावर शेलारांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर मुंबईच्या प्रदुषणाबाबत प्रश्न उपस्थित केले. २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता करणाऱ्या उद्धव बाळासाहेव ठाकरेने मुंबईसाठी काय केले?  कागदावर जंगल घोषित करणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना काय दिले? असा सवाल आता आशिष शेलारांनी केला. तुमच्या आजूबाजूला सध्या चालता-बोलता माणूस अचानक दगावतो? तरुणाचा अचानक मृत्यू होतो?  हृदविकाराच्या झटक्याने तुमचा नातेवाईक जातो? अचानक श्वास गुदमरून माणूस मरतोय? घरातील वृध्दांना श्वसनाचे आजार लागतात? लहान मुलांना डोळ्याचे आजार जडलेत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

२०२२ मध्ये ‘आयक्यू एअर’ या संस्थेने जगातील ६ हजार ४७५ दुषित शहरांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत १२४ व्या क्रमांकावर आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या आकडेवारीनुसार तीव्र ब्रॉन्कायटिस, दमा व न्यूमोनिया गेल्या पाच वर्षांत एकूण १३ हजार ४४४ मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबईत ३ हजार ५०० बांधकामे सुरु झाली. यावर्षी हाच आकडा आता ६ हजारापर्यंत पोहचला. म्हणजे केवळ वर्षभरात २ हजार ५०० बांधकाम साईट वाढल्या. यामुळे मंबईतील प्रदुषण वाढले आहे.

मुंबईची ‘प्रदूषण नगरी’ अशी ओळख करुन दाखवली. अशी टीका आता आशिष शेलारांनी केली आहे. यास प्रत्युत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी शेलारांवर पलटवार करत आपली बाजू मांडली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबई महापालिकेच्या प्रदुषणावर आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केला आहे. यावर आता आदित्य ठाकरेंनी आशिष शेलारांवर मुंबई महापालिका आणि प्रदूषणाच्या मुद्दयावर आशिष शेलारांचे कान टोचले आहेत. ते म्हणाले की, महापालिकेच्या प्रशासकांनी सांगावे की, या महाघोटाळ्यातील रस्त्यांची कामे कधी सुरु होणार? त्याचबरोबर त्यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरील मौन सोडून त्यावर काय केले, हेही सांगायला हवं. मुंबईत बिल्डर आणि कंत्राटदारांसाठी काही नियमावली काढली आहे. पण अशी नियमावली मार्चमध्ये आणि त्याआधी देखील काढली. या नियमांची अंमलबजावणी का नाही झाली? त्याचे उल्लंघन कोणी केले? असा प्रतिसवाल करत आदित्य ठाकरेंनी आशिष शेलारांवर पलटवार केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी