31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयYouTube Videos Banned‍: केंद्र सरकारने खोटया बातम्या व धार्मिक द्वेष निर्माण करणारे...

YouTube Videos Banned‍: केंद्र सरकारने खोटया बातम्या व धार्मिक द्वेष निर्माण करणारे 45 व्हिडिओ केले ब्लॉक

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अवरोधित केलेले काही व्हिडिओ अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र दल, भारताची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर आणि इतर विषयांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरले जात होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि परदेशी राज्यांशी भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीकोनातून यूटयूबवरील हे व्हिडिओ खोटे आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले असे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म – यूटयूबला (YouTube) ला एकूण 10 चॅनेलवरील 45 व्हिडिओ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. ब्लॉक केलेल्या या व्हिडिओंना 1 कोटी 30 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज (Views) होते.  युटयूबर (YouTuber) ध्रुव राठीचा (Dhruv Rathee) व्हिडिओ ब्लॉक केलेल्यांपैकी आहे. गुप्तचर संस्थांच्या (Intelligence Agencies) माहितीच्या आधारे 23 सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाबदद्ल बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 10 यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. या चॅनेल्सनी चुकीची माहिती देऊन मित्र देशांशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला आहे  आणि  देशाच्या विरोधात विष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही असे निर्णय राष्ट्रहितासाठी यापूर्वीही घेतले होते आणि गरज पडल्यास भविष्यात देखील घेऊ.

संबंधित व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश 23.09.2022 रोजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) नियम 2021 च्या तरतुदींनुसार जारी करण्यात आले होते असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये बनावट व खोटया बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ करण्यात आलेले व्हिडिओ यांचा समावेश आहे. यामध्ये खोटे दावे जसे की, सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतले आहेत, काही धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या, भारतातील गृहयुद्धाची घोषणा आणि इतर व्हिडिओंचा समावेश आहे. अशा व्हिडिओमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असल्याचे आढळून आले.

हे सुद्धा वाचा –

Virat Kohli : विराट कोहलीमध्ये धावा करण्याची भूक पूर्वीप्रमाणे वाढली – संजय बांगर

Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांचे ‘मुख्यमंत्री’ पद वाचले

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना दिलासा मिळणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अवरोधित केलेले काही व्हिडिओ अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र दल, भारताची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर आणि इतर विषयांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरले जात होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि परदेशी राज्यांशी भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीकोनातून यूटयूबवरील हे व्हिडिओ खोटे आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले असे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काही व्हिडिओंमध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या या भागांची सीमा भारतीय हद्दीबाहेर दाखवण्यात आली आहे. अशा प्रकारचे चुकीचे चित्रण भारताच्या सार्वभौमत्व, परकीय राज्यांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध, देशातील सार्वजनिक सुव्यवस्था  आणि प्रादेशिक अखंडतेसाठी हानिकारक असल्याचे आढळून आले. त्यानुसार, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A च्या कक्षेत बसत नसल्यामुळे या आक्षेपार्ह चॅनेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी