33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयकिरीट सोमैयांवर लावलेले आरोप फेटाळत चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा

किरीट सोमैयांवर लावलेले आरोप फेटाळत चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा

टीम लय भारी

मुंबई : चंद्रकांत पाटलांनी हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमैयांवर लावलेले आरोप फेटाळून लावत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पाटील यांनी ट्विट करत हसन मुश्रीफ आणि राज्य सरकारवर खरमरीत टीका केली आहे (Chandrakant Patil tweeted harsh criticism of Hasan Mushrif and the state government).

ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आपले गुन्हे झाकण्यासाठी खोटे आरोप रचून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकारांशी संवाद साधत असताना हसन मुश्रीफ यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. जनता सुज्ञ असून दिशाभूल करण्याचा प्रयत्नांना कधीही यश येणार नाही असे पाटील यांनी म्हटले आहे.

‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो : चंद्रकांत पाटील

पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत, चंद्रकांत पाटीलांनी उद्धव ठाकरेंना खिजवले

हल्ली १००-१०० कोटी रुपयांचे इतके घोटाळे लागोपाठ उघडकीस आले आहेत, की १०० कोटी ही रक्कम ही छोटी वाटू लागली आहे. जर किरीट सोमैय्यांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकायचाच असेल तर स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी लागणारा व्हाईट मनी आपल्याकडे आहे की वर्गणी म्हणून गोळा करणार आहात? असा प्रश्न पाटलांनी मुश्रीफांवर केला आहे ((Patil has asked Mushrif question that If you want to sue Kirit Somaiya for defamation, do you have the white money to pay the stamp duty or are you going to collect it as a subscription)

चंद्रकांत पाटील यांचा जावईशोध, म्हणे ‘जम्मू – काश्मिर’ मध्ये ‘आदर्श लोकशाही’

mumbai: BJP will support and ensure justice for Karuna Sharma, says Chandrakant Patil

 हॅब्रिड ऍन्युइटीमध्ये घोटाळा झाला असे मुश्रिफांचे म्हणणे आहे, पण त्यातूनच तयार झालेल्या रस्त्यांची उद्घाटने करत सत्ताधारी नेते राज्यभर फिरत आहेत. कोरोनाकाळात फक्त पैसे खाण्याचेच काम या सरकारने केले. कुठलाही घोटाळा झालेला नाही आणि झाला असेल तर १९ महिने झोपा काढत होतात का? जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी नेते रोज उठून म्हणतात की पुढची 25 वर्षे हे सरकार टिकणार आहे. तरीही हसन मुश्रीफ यांनी असे म्हटले की “ हा महाविकास आघाडीचा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे.” तुम्ही जर फेविकॉल लावल्यासारखे एकमेकांना चिटकून बसला आहात तर घाबरण्याचे कारण काय? असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातील महिलांवर इतके अत्याचार होत आहेत, ऐकवत नाहीत अशा घटना घडत आहेत, महाविकास आघाडीतील कार्यकर्ते – नेते मात्र हाथरसमधील आणि उत्तर प्रदेशमधील इतर घटनांचे दाखले देत आहेत. उत्तर प्रदेशमधील राज्य सरकार आणि जनता तिथले प्रश्न बघेल, आपण सर्वजण इथल्या परिस्थितीशी लढूया, असे पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी