30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयये पब्लिक सब जानती है; छगन भुजबळांचा नारायण राणेंना टोला

ये पब्लिक सब जानती है; छगन भुजबळांचा नारायण राणेंना टोला

टीम लय भारी

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्दयांवर भाष्य केलं. यावेळी नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काल नारायण राणे यांनी ट्विट करत मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले असं म्हटलं होतं. त्यावर पत्रकार परिषदेत विचारले असता नारायण राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे(Chhagan Bhujbal criticizes Narayan Rane, public knows everything).

तर दुसरीकडे नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान टोलेबाजी करत आपल्या शैलीत उत्तर दिले. भुजबळ म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आनंदाचे वातावरण आहे. आज पत्रकार परिषद झाली नसती, तर बरं झालं असतं. मात्र, असो म्हणत त्यांनी काँग्रेस सोडून काही लोक भाजपमध्ये का गेले? पब्लिक सब जानती है, म्हणत नारायण राणे यांना जोरदार टोला हाणला. त्यामुळे येणाऱ्या काळात या पत्रकार परिषदा आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार आहे(Chhagan Bhujbal answered in his own style in Nashik).

नारायण राणे म्हणाले, सर्व प्रॉपर्टीबद्दल मी योग्य माहिती पोहोचवली आहे. भुजबळ आत गेले अडीच वर्षे… सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहेत. सीए दोघांचा एकच आहे. माझ्या इतकी माहिती कोणाला नाही. मी इन्कम टॅक्सलाही 13 वर्षे होतो.मी जाहीरपणे बोललो, मीडियाला सांगितलं याचा अर्थ काही असल्याशिवाय आहे का? आता मी तुम्हाला भुजबळांचं उदाहरण दिलं तुमच्या इतकंही लक्षात येत नाही. सेम ऑफेन्स आहे. भुजबळ अडीच वर्षे कारागृहात गेले मग हे का नाही गेले? असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी ती कारवाई!

नारायण राणेंचा शिवसेना पक्षावर हल्लाबोल

वक्त सबका बदलता है; छगन भुजबळांचा शायराना अंदाजातून भाजपवर निशाणा

Don’t spread religious hatred among students, says minister

दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे सारे सुशांत सिंगला जेव्हा कळलं, तेव्हा तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कुठे झाले. 13 जूनला गायब झाले, असा दावाही त्यांनी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आरोपाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की,आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आनंदाचे वातावरण आहे. आज पत्रकार परिषद झाली नसती, तर बरं झालं असतं. मात्र, असो. मातोश्रीवरच्या आरोपांच्या संबंधाने भुजबळ म्हणाले की, तशी परिस्थिती नाही. त्यांचे आणि माझे सीए वेगळे आहेत. त्यांच्या सीएचा आमच्या सीएशी संबंध नाही. आजकाल कारवाई करताना मटेरिअल महत्वाचे नाही. दिल्लीवरून आदेश आला की, नसलं तरी कारवाई होते.

काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आपल्या पार्टीत येणार म्हटल्यावर, इनको छोड दो असा उलटा संदेश येतो, असा दावा त्यांनी केला. छगन भुजबळ पुढे म्हणाले की, एक दोन माणसं अख्ख्या राज्यात आरोप करत फिरत होते. त्याला संजय राऊत यांनी कणखर उत्तर दिलं. काँग्रेस सोडून काही लोक भाजपात का गेले, हे सगळ्यांना माहिती आहे. पब्लिक सब जानती है, असा टोलाही त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी