31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने केला रद्द

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने केला रद्द

टीम लय भारी

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Government) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे(devendra fadnavis government’s taken decision was cancelled by thackery government)

 कोकण विभागातील सहा प्रकल्पांमधील यापुर्वीचे निविदा विखंडनाचे आदेश रद्द करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, 64MP बॅक, 50MP फ्रंट कॅमेरासह जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

टी 20 वर्ल्डकप 2021 : हार्दिक पंड्याची क्रिकेट प्रेमींसाठी भावनिक पोस्ट

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) होते. या अनुषंगाने 30 ऑगस्ट 2016 रोजी घेतलेला निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये या प्रकल्पाच्या निविदांना स्थगिती देण्यात आली होती.

कोकण विभागातील शिरशिंगे, शाई, सुसरी, चणेरा, जामदा व काळ या सहा प्रकल्पाच्या निविदेप्रक्रियेत कथित गैरप्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु होती. ती नंतर बंद करण्यात आली होती.

वायू प्रदूषणाच्या गंभीर परिणामांपासून रक्षण करण्याचे 5 नैसर्गिक उपाय!

Mumbai: Nawab Malik’s son-in-law sends defamation notice to Devendra Fadnavis

उच्च न्यायालयाने विविध याचिकांशी संबंधित 8 जून 2021 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी खालील प्रमाणे अटी व शर्ती राहतील. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या सक्षम अधिकाऱ्याने स्वयंस्पष्ट आदेश द्यावेत. प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या विविध टप्प्यांवर झालेल्या अनियमितता गृहित धरता येणार नाही. या प्रकल्पांबाबत चालू असलेल्या अथवा प्रस्तावित विभागीय चौकशीची कार्यवाही पूढे सुरू राहील. या निर्णयामुळे विभागीय चौकशीस बाधा पोहोचणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी