27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयकाका विरोधात बंडानंतर राजकीय आश्रय देणाऱ्यालाच धनंजय मुंडे विसरले!

काका विरोधात बंडानंतर राजकीय आश्रय देणाऱ्यालाच धनंजय मुंडे विसरले!

राष्ट्रवादी कॉँग्रेससमध्ये नक्की काय चाललेय, याचा अंदाज कुणालाही लावत येत नाही. पण काही महिन्यापूर्वी एकाच पक्षात असलेले, एकमेकांचे मित्र असलेले राष्ट्रवादीतील नेतेमंडळी एकमेकांवर तुटून पडत आहेत. अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे- पाटील यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यावर ‘तुमचा ( धनंजय मुंडे) एकंदरीत राजकीय इतिहास पाहता पवार यांनी तुम्हाला खूप संधी दिल्या. हे पवार यांचे तुमच्यावर असलेले उपकार आहेत आणि उपकाराची परतफेड अशी कृतघ्न होऊन फेडली जाते हे महाराष्ट्राला पहिल्यांदा पाहायला मिळालं.’ अशा कठोर शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधातील बंडानंतर धनंजय मुंडे हे काहीसे एकाकी पडले होते. तेव्हा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजकीय आश्रय दिला. कृष्णा खोरे महामंडळातील मोठे कंत्राट मिळवून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. असे असताना धनंजय मुंडे उपकार करणाऱ्यांना विसरले का, अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत. रविवारी बीड येथील उत्तरदायीत्व सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी, ‘बीड जिल्ह्याने शरद पवार साहेबांवर फार प्रेम केलं, मात्र त्याबद्दल साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे.’ अशी टीका केल्याने शरद पवार गटाचे नेते मुंडे यांच्यावर चिडले आहेत.

‘तुमचा (धनंजय मुंडे) एकंदरीत राजकीय इतिहास पाहता पवार यांनी तुम्हाला खूप संधी दिल्या. हे पवार यांचे तुमच्यावर असलेले उपकार आहेत आणि उपकाराची परतफेड अशी कृतघ्न होऊन फेडली जाते हे महाराष्ट्राला पहिल्यांदा पाहायला मिळालं.’ अशा कठोर शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर विधान परिषदेचे आमदार, विरोधी पक्षनेते ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय सारखं महत्त्वाच्या खात्याचे मंत्री केलं. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेच होते. एवढी सर्व पदे पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाकरिता दिली होती.’ याची आठवण वरपे यांनी करून दिली आहे.

हे सुद्धा वाचा
नीरजच्या सुवर्ण कामगिरीवर आनंद महिंद्राची ट्विटर पोस्ट चर्चेत
शिवरायांसोबत बाबासाहेब पुरंदरेंचे शिल्प; कारवाई करा, अन्यथा सुट्टी नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा
ठाण्यातील ‘हा’ देखणा घुमट कोणी बनविला ? जाणून घ्या वैशिष्ट्ये

धनंजय मुंडे यांनी राजकारणाचे धडे काका गोपीनाथ मुंडे यांच्याकडून घेतले. पण राजकीय वारसाचा प्रश्न निर्माण होऊ लागल्यावर गोपीनाथ मुंडे यांचा कल मपथि कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे असल्याचे निदर्शनास येताच धनंजय मुंडे अस्वस्त झाले. त्यांना एक भक्कम राजकीय आधार गरजेचा होता, तो शरद पवार ठरले. धनंजय मुंडे यांनी काकाला सोडल्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.

मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे आमदार, विरोधी पक्षनेते ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय सारखं महत्त्वाच्या खात्याचे मंत्री केलं. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीही धनंजय मुंडेच होते. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यावर त्यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असताना विरोधकांना शांत करण्यासाठी कोणी रसद पुरवली, हे सगळ्यांना माहीत आहे. असे सगळे काही असताना धनंजय मुंडे शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप कसा करतात असा सवाल आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत. शरद पवार यांनी मनात आणले तर ते भविष्यात धनंजय मुंडे यांना घरीही बसवू शकतात, अशा तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून येत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी