34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक !

धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक !

टीम लय भारी

मुंबई : देशात सर्वत्र सायबर क्राईमचे जाळे वाढत असताना, आता खुद्द एका मंत्र्यावर सायबर क्राईम झाला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. शिवाय याप्रकरणी सायबर क्राईमकडे आपण तक्रार देखील नोंदवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे (Dhananjay Munde’s Facebook page hacked).

“माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.” असं धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, समीर वानखेडेंवर होणार गुन्हा दाखल?

याचबरोबर, मी धनंजय मुंडे या माझ्या अधिकृत फेसबुक पेजवरील ऍडमिन किंवा मॉडरेटरचा ऍक्सेस गमावला आहे. असे ही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

फेसबुकवर धनंजय मुंडे आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर

Dhananjay Munde’s Facebook page hacked, lodges complaint with Facebook & Cyber Cell

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी