30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमनोरंजनविनोदाचा बादशाह... अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस

विनोदाचा बादशाह… अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस

टीम लय भारी

मराठी चित्रपटसृष्टीतला हरहुन्नरी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या लक्ष्याचा आज जन्मदिवस. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्याचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 26 ऑक्टोबर 1954 रोजी रत्नागिरी येथे झाला होता (Laxmikant Berde, Happy birthday comedy king).

लक्ष्याने गणेशोत्सवातील कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. शाळा, कॉलेज मधून त्यांनी नाटकात वेगवेगळ्या भूमिका ही स्विकारल्या होत्या.

संजय लीला भन्साळी- सलमान खान यांची जोडी तब्बल २१ वर्षांनी दिसणार पडद्यावर

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोण देतं? कलाकारांची निवड कशी होते, त्यांना पुरस्कारात काय मिळते?, या बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Laxmikant Berde, Happy birthday comedy king
टूर टूर” या नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात लक्ष्याला एक नवीन ओळख मिळवून दिली

“टूर टूर” या नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात लक्ष्याला एक नवीन ओळख मिळवून दिली. मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील लक्ष्याने अजरामर भूमिका केल्या, कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळालीत. तो अत्यंत दमदार कामगिरीसाठी ओळखला जात असे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण मोठे झाल्यावर बस कंडक्टर व्हायचं असं त्यांचे स्वप्न होतं, कारण कंडक्टर जवळील पैशाने भरलेली बॅग पाहून त्यांना अस वाटत होते कि हे सगळे पैसे आपलेच असतात. नंतर त्यांना अभिनयात गोडी वाटू लागली.

Happy Birthday Malaika Arora: अर्जुनने मलायकासाठी केली खास रोमँटिक पोस्ट म्हणाला…

Trending Entertainment News Today: Aryan Khan case ‘witness’ Kiran Gosavi to surrender; Saif Ali Khan won’t be able to give a penny from his Rs 5000-crore property to sons and more

पहिला चित्रपट “लेक चालली सासरला” येथून त्याच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात झाली. त्यानंतर अभिनयाचे बरेच दरवाजे त्याच्या साठी उघडले गेले. सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी हि बनवाबनवी” या चित्रपटातील त्याची साडी नेसून साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली. लक्ष्मीकांत बेर्डे याचे, मराठा बटालियन, देखणी बायको नाम्याची, खतरनाक, नवरा मुंबईचा, धांगड धिंगा, धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, एक होता विदूषक अशी अनेक मराठी चित्रपट गाजली होती.

Laxmikant Berde, Happy birthday comedy king
लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण मोठे झाल्यावर बस कंडक्टर व्हायचं होतं

मैने प्यार किया’ हा लक्ष्मीकांत बेर्डेचा पहिला हिंदी चित्रपट होता. लक्ष्याचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे होते. लक्ष्याला वयाच्या 50 व्या वर्षी गंभीर आजराने ग्रासले. त्यानंतर बरेच दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर लक्ष्याने 16 डिसेंबर 2004 रोजी अखेरचा श्वास घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी