28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयएकनाथ खडसेंना प्रवेश देण्यासाठी राष्ट्रवादीने घातली ‘ही’ अट

एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यासाठी राष्ट्रवादीने घातली ‘ही’ अट

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना पक्षप्रवेश देण्यासाठी स्वतः शरद पवार सकारात्मक आहेत. पण त्यासाठी खडसे यांना एक महत्वाची अट घालण्यात आली आहे ( Eknath Khadse on the way to NCP ).

खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. रक्षा खडसे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी अट घालण्यात आली आहे ( NCP imposed conditions to Eknath Khadse ).

एकनाथ खडसे यांची मात्र लगेचच राजीनामा देण्याची तयारी नाही. पक्षप्रवेश झाल्यानंतर रक्षा खडसे राजीनामा देतील, अशी विनंती खडसे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

SRA Scam : एसआरएमधील फ्लॅट आणि ऑफिस बळकावणा-या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात किरीट सोमय्यांचे आंदोलन

Open Restaurant : रेस्टॉरंट लवकरच उघडण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना ‘कोरोना’ची लागण

दुसऱ्या बाजूला खडसे यांना जळगावचे राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांचा विरोध आहे. परंतु देवकर व पाटील यांची समजूत काढण्याची राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाची भूमिका आहे.

खडसे हे भाजपमधील मातब्बर नेते आहेत. ते जर राष्ट्रवादीमध्ये आले तर भाजपवर तोफ डागण्यासाठी मोठा फायदा होईल, अशी खुद्द शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यास पवारांनाही स्वारस्य आहे ( Sharad Pawar positive for Eknath Khadse ).

तूर्त खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडला असला तरी योग्य वेळी खडसे यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले ( Eknath Khadse will join NCP at near future ).

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी