31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयEknath Shinde : 'मुख्यमंत्री शिंदे यांना गणेशोत्सवानंतर पितरं सुद्धा अटेंड करावी'

Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री शिंदे यांना गणेशोत्सवानंतर पितरं सुद्धा अटेंड करावी’

महाराष्ट्रातील फेसबूक विचारवंत म्हणून ओळखले जाणारे विश्ववंभर चौधरी यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीविषयी चिंता व्यक्त करीत राज्याच्या कारभारावर तारेशे ओढले आहेत. राज्यातील सत्तानाट्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आले आणि राज्यातील राजकारण एक वेगळ्याच दिशेने चाल करू लागले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असतात. यावेळी त्यांच्या गणपती दर्शनाचा मुद्दा गाजत आहे. राज्यात मंत्रिमंडळाची वर्णी लागली असली तरीही राज्यात सध्या अनेक अडचणी ठाण मांडून बसले आहेत, शिवाय बळीराजाचा प्रश्न आ वासून बघतच आहे, परंतु या सगळ्यांकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री वेगळ्याच गोष्टींमध्ये जास्त व्यस्थ असल्याचे पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. काल अमित शाह मुंबईत आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या संपुर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी गणशोत्सवानंतर पितरं सुद्धा अटेंड करावी असा खोचक टोलाच लगावण्यात आला आहे.

विश्ववंभर चौधरी यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. फेसबुक पोस्टमध्ये चौधरी लिहितात, मुख्यमंत्री सध्या दररोज दहापाच गणपतींचं दर्शन घेत आहेत. अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षात त्यांना घरोघरी जाऊन पितरं अटेन्ड करावी लागणार. ते झालं की दहा दिवस सगळीकडे देवीचं दर्शन. मग हाहा म्हणता दिवाळी येईल की पुन्हा वेगवेगळ्या नेत्यांच्या घरी फराळाला. दिवाळी झाली की लग्न सराई. सगळीकडे लग्न लावत फिरावं लागणार असे म्हणून विश्ववंभर चौधरी यांनी मिश्किल शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. पुढे विश्ववंभर चौधरी म्हणतात, राज्य चालवण्यासाठी एक स्वतंत्र मुख्यमंत्री असावा अशी तरतूद घटनेत व्हायला हवी, असे म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा…

Congress: काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना धक्का!‍

VIDEO : IAS अधिकाऱ्याच्या घरचा पर्यावरणपूरक देखणा गणपती !

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे मिलिंद नार्वेकरांविषयी मोठे वक्तव्य

महाराष्ट्रातील फेसबूक विचारवंत म्हणून ओळखले जाणारे विश्ववंभर चौधरी यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीविषयी चिंता व्यक्त करीत राज्याच्या कारभारावर तारेशे ओढले आहेत. राज्यातील सत्तानाट्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आले आणि राज्यातील राजकारण एक वेगळ्याच दिशेने चाल करू लागले. विरोधक कितीही टीका करीत असले तरीही मी पुन्हा येणार चा नारा कायम ठेवत येत्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागल्याचे दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यकारभारावर कोणी समाधान व्यक्त करीत असले तरीही अनेक जण तीव्र संताप व्यक्त करीत टीका करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी