29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्हिडीओVIDEO : IAS अधिकाऱ्याच्या घरचा पर्यावरणपूरक देखणा गणपती !

VIDEO : IAS अधिकाऱ्याच्या घरचा पर्यावरणपूरक देखणा गणपती !

आयएएस अधिकाऱ्यांविषयी अनेकांना नेहमीच उत्सुकता असते, प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांचे नाव मोठे असते, जिल्हाधिकारी, प्रशासक म्हणून त्यांनी वेळोवेळी जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात, परंतु जेव्हा जेव्हा सामान्य माणसांच्या ते संपर्कात येतात तेव्हा ते त्यांच्यातील एक होऊन त्यांच्याशी आपुलकीने बोलतात.. अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची लय भारी टीमने नुकतीच मुलाखत घेतली.
आयएएस अधिकारी मल्लीनाथ कळशेट्टी सरांच्या घरी लय भारी टीमने भेट दिली. त्यावेळी त्यांच्या बाप्पाविषयी, बाप्पाच्या सजावटीविषयी ते भरभरून बोलले. नेहमीच पर्यावरण पूरक गोष्टींविषयी काळजीपूर्वक, जबाबदारीने भूमिका पार पाडत नवनवीन प्रयोग ते नेहमीच राबवत असतात.
यंदाची बाप्पाची सजावट सुद्धा अशीच काहीशी पाहायला मिळाली. केळीच्या पानांचा वापर करून त्यांनी यावेळी संपुर्ण सजावट केली आहे. शिवाय एक रोपटं सुद्धा त्यांनी आवर्जून तिथे ठेवले आहे. कायमच पर्यावरण पूरक गोष्टींची कास धरणारे मल्लीनाथ कळशेट्टींचे काम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी