25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
HomeराजकीयElection : राज्यातील ५ महापालिका, २० नगरपालिका, नगरपंचायती आणि १४ हजार ग्रामपंचायतींच्या...

Election : राज्यातील ५ महापालिका, २० नगरपालिका, नगरपंचायती आणि १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार!

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाची साथ (Covid 19) असतानाही बिहार विधानसभेच्या निवडणुका (Bihar Election) घेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Elections for 5 Municipal Corporations, 20 Municipalities, Nagar Panchayats and 14,000 Gram Panchayats in the state will be held in February!)

मुदत संपलेल्या किंवा लवकरच संपणा-या नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायती आणि राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीत घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. (The state Election Commission has started preparations for the elections in February)

परंतु कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली तरच फेब्रुवारीत निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. (Elections are scheduled for February only if Corona’s population is brought under control)

कोरोनामळे एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित अशा १ हजार ५६६; तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणा-या आणि नवनिर्मित १२ हजार ६६७ अशा एकूण १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत केल्या जात आहेत. यापैकी एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार होते; परंतु कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Corona has postponed these elections)

मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणा-या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले. (The final voter lists will be released on December 10, said State Election Commissioner U. P. S. Madan)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी