30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयगोपीचंद पडळकरांची राज्यपालांकडे विनंती, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच बसवावा

गोपीचंद पडळकरांची राज्यपालांकडे विनंती, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच बसवावा

टीम लय भारी

सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी पडळकरांनी विनंती केली आहे (Gopichand Padalkar request to the Governor).

अहिल्या देवी होळकरांची शिवपिंड धारण केलेली प्रतिमा आजही जनसामान्यात  रुजलेली आहे. त्याचबरोबर त्या एक कुशल प्रशासक, मुत्सद्दी राजकारणी आणि महापराक्रमी महाराणी होत्या. त्यामुळे त्यांच्या या पराक्रमी बाण्याचा पैलूही जनसामान्यात रुजला पाहिजे, असे पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

Gopichand Padalkar request to the Governor
अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी पडळकरांची राज्यपालांना विनंती
गोपीचंद पडळकरांची राज्यपालांकडे विनंती, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच बसवावा
गोपीचंद पडळकरांचे राज्यपालांना पत्र

अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करत तरुण-तरुणी येतात. त्यामुळे  अहिल्या देवींचा अश्वारूढ असलेला पुतळा विदयार्थ्यांच्या संघर्षाला प्रेरणा देईल. तसेच अहिल्यादेवींचे शिवपिंड धारण केलेले अनेक पुतळे इंदौरपासून जेजुरी संस्थान पर्यंत आहेत. परंतु, अन्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा अहिल्या देवींचा अश्वारूढ पुतळा अद्याप उभारला गेलेला नाही असे पडळकरांनी पत्रात लिहिले आहे.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा

‘Farmers attending, not Taliban’, says BJP leader over police presence to prevent banned Sangli bullock cart race

याआधीही स्मारक समितीने अहिल्याबाई होळकरांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा घेतलेला निर्णय सर्वाना मान्य होता. परंतु, काही राजकारणी लोक या निर्णयामध्ये बाधा टाकत आहेत. राज्याचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती म्हणून आपण अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला द्याव्यात, अशी विनंती पडळकरांनी राज्यपालांकडे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी