29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी आहेत तरी कोण?

मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी आहेत तरी कोण?

निवडणूक आयोगानं इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी (BMC Commissioner) ज्येष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS Bhushan Gagrani Appointed As Bmc Commissioner)

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारने अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या आदेशामध्ये  ठाणे महापालिका आयुक्तांसह आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर आज तीन बड्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची माहिती समोर आली आहे. भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी, सौरभ राव यांना ठाणे महापालिका आयुक्तपदी आणि कैलाश शिंदे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी आहेत तरी कोण?

तर कोण आहेत मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी?

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी, डॉ. संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्यात आली होती, त्यात गगराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

भूषण गगराणी हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची जबाबदारीदेखील होती.

गगराणी यांनी यापूर्वी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. तसंच, माहिती व जनसंपर्क विभागाचे (DGIPR) महासंचालकपदही भूषवलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी मार्च २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्समध्ये त्यांचा सहभाग होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी