29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये २० लाखाचा गांजा जप्त

नाशिकमध्ये २० लाखाचा गांजा जप्त

पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई करत मखमलाबाद येथून दोघा संशयितांना अटक करत २० लाख ३७ हजार ६०० रुपये किंमतीचा जवळपास १०२ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे मखमलाबाद गावात एकच खळबळ उडाली असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या कार्यक्षमतेवर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. औदुंबरनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक हे आपल्या चारचाकी क्रमांक एमएच ०४ बी क्यु ०७७८ या गाडीच्या डिकीमध्ये हिरवट रंगाची पाने, फुले व बिया असलेला कॅनाबिस (गांजा) एकुण २० लाख ३७ हजार ६०० रुपये किंमतीचा एकुण १०१ किलो ८८० ग्रॅम वजन असलेल्या अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई करत मखमलाबाद येथून दोघा संशयितांना अटक करत २० लाख ३७ हजार ६०० रुपये किंमतीचा जवळपास १०२ किलो गांजा जप्त < Rs 20 lakh Ganja seized in Nashik > केला आहे. या कारवाईमुळे मखमलाबाद गावात एकच खळबळ उडाली असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या कार्यक्षमतेवर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

याबाबत गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दिलेली माहिती अशी की, सोमवार दि. १८ रोजी पावणे सहा वाजेच्या सुमारास मखमलाबाद शिवारातील मानकर मळा परिसरात संशयित संशयित ज्ञानेश्वर बाळु शेलार, ३२, हल्ली रा. जयशंकर रो हाऊस नं. ८, श्रीकृष्ण मंदीराजवळ, मानकर मळा, मखमलाबाद, नाशिक, मुळ रा. घर नं. १९३, वावरे लेन, शिवाजी रोड, शालीमार, भद्रकाली, नाशिक आणि संशयित निलेश अशोक बोरसे, २७, रा. रो हाऊस नं. १ बी १, मातोश्री निवास, पुष्कर व्हॅली अपार्टमेंट,औदुंबरनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक हे आपल्या चारचाकी क्रमांक एमएच ०४ बी क्यु ०७७८ या गाडीच्या डिकीमध्ये हिरवट रंगाची पाने, फुले व बिया असलेला कॅनाबिस (गांजा)< Ganja seized > एकुण २० लाख ३७ हजार ६०० रुपये किंमतीचा एकुण १०१ किलो ८८० ग्रॅम वजन असलेल्या
अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

या संशयितांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (क) सह २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत तोडकर, पोलीस उप निरीक्षक लाड, दिलीप सगळे, सपोउपनि रंजन बेंडाळे, पोहवा. संजय ताजणे, देवकिसन गायकर, किशोर रोकडे, गणेश भामरे, डंबाळे, पोना भूषण सोनवणे, दिघे, चकोर, पोअं वडजे, येवले, सानप, नांद्रे, बागडे, निकम, फुलपगारे, राऊत, चव्हाण, मपोअ कदम यांच्या पथकाने केली आहे.

मखमलाबाद गाव हा ग्रामीण परिसर आणि शेतकऱ्यांचा रहिवासी भाग म्हणून ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मखमलाबाद गाव अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध होत असल्याचे दिसत आहे. या गावात अवैध दारू विक्री, मटका, कालापीला, पत्त्यांचे क्लब सुरु झाले आहे. तसेच, या संपूर्ण रस्त्यावर अनेक हॉटेल चालक दारू विक्री करणे आणि दारू पिण्यास बसू देण्याचे बेकायदेशीर काम करत असल्याने या परिसराची ओळख चुकीच्या पद्धतीने सुरु झाली आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या वरद हस्ताने सुरु आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, थेट पोलीस आयुक्तालयातील विशेष पथक येऊन इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून जात असेल तर म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक नेमके काम काय करते याबाबत मखमलाबाद मध्ये चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी