31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeराजकीयमाढ्यात पवारांनी धनगरांना केवळ उमेदवारीचे गाजर दाखवले:स्वरूप जानकर

माढ्यात पवारांनी धनगरांना केवळ उमेदवारीचे गाजर दाखवले:स्वरूप जानकर

स्वरूप जानकरांचा आरोप माढा (Madha) लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनगर समाजाला संधी देणार, असे स्वतः शरद पवार यांनी अनेकदा बोलून दाखवले होते. तर दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ . अनिकेत देशमुख यांना शेकापच्या माध्यमातून तर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादीत आणून लोकसभेला उभा करण्याचे नियोजन असल्याची हवा राष्ट्रवादीने तयार केली होती.तर स्वतः शरद पवार यांनी धनगर समाजाला संधी देणार असल्याचे सांगितल्याने धनगर समाजात आशादायी चित्र होते. मात्र प्रत्यक्षात धनगर समाजाला फक्त उमेदवारीचे गाजर(Dhangar community only shown carrot of nomination) दाखवले गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप स्वरूप जानकर यांनी केला आहे.(In Madha, Pawar showed dhangars only the carrot of nomination:Swaroop Jankar)

पवारांनी स्क्रीप्टेड पद्धतीने माढा लोकसभा मतदारसंघाचा निर्णय केला आहे. त्यानुसारच आज पवार अकलूजला जात आहेत. त्यांना मोहिते पाटील यांनाच तिकीट द्यायचे होते. मोहित्यांच्या सोयीसाठी फक्त धनगर उमेदवाराची चर्चा घडवून आणली . त्यांना माढ्यातील ५ लाख धनगर समाजापैकी एकही धनगर उमेदवारीसाठी पात्र वाटला नाही, याचे विशेष वाटते. राज्यातील बदललेल्या परिस्थितीत धनगर समाजाला माढ्यात उमेदवारीत प्रतिनिधीत्व मिळेल, अशी भावना राज्यभरातील अनेक धनगर बांधवांची होती. मात्र शरद पवारांनी उपेक्षित धनगर समाजाला कात्रजचा घाट दाखवून प्रस्थापित मोहिते पाटलांना संधी दिली अशी टीका स्वरूप जानकर यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी