28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअपक्ष आमदाराने 50 वर्ष जुन्या पक्षाच्या कार्यालयावर दावा करणे हास्यास्पद जनता दलाचा...

अपक्ष आमदाराने 50 वर्ष जुन्या पक्षाच्या कार्यालयावर दावा करणे हास्यास्पद जनता दलाचा बच्चू कडूवर हल्लाबोल

बच्चू कडू यांचा पक्ष कुठला? ते स्वतः अपक्ष आमदार आहेत. निवडणूक आयोगाची त्यांच्या पक्षाला मान्यता नाही. या उलट जनता दलाला राज्यस्तरीय मान्यता आहे. त्यामुळे एखाद्या अपक्ष आमदाराने मान्यताप्राप्त पक्षाच्या 50 वर्ष जुन्या कार्यालयावर दावा करणे हास्यास्पद आहे, असा हल्लाबोल जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार शरद पाटील यांनी बच्चू कडू यांच्यावर केला आहे. माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी ‘आमदार, खासदार नसलेल्या पक्षाने कार्यालयासाठी दावा का करावा, असा सवाल करत, ‘एखाद्या पक्षाला सरकारने एखादे कार्यालय वापरायला दिले तर ते त्यांच्या मालकीचे होत नाही, गेली अनेक वर्ष ते कार्यालय बंद होते, त्यामुळे सरकारने त्या कार्यालयातील एक भाग आम्हाला वापरायला दिला तर कुठे बिघडले,’ असे ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले. त्याला जनता दलाने तातडीने प्रत्युत्तर दिले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या मंत्रालय समोरील कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा अचानकपणे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला देऊन टाकली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे समाजवादी परिवारात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात जनता दल सेक्युलर पक्षाचे पाच माजी आमदार खासदार मंत्रालयासमोर आमरण उपोषण करतील असा थेट इशारा पक्षाचे राज्य महासचिव रवि भिलाणे यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता. या संदर्भात माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आमदार, खासदार नसलेल्या पक्षाने कार्यालयासाठी दावा का करावा, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ‘एखाद्या पक्षाला सरकारने एखादे कार्यालय वापरायला दिले तर ते त्यांच्या मालकीचे होत नाही, गेली अनेक वर्ष ते कार्यालय बंद होते, त्यामुळे सरकारने त्या कार्यालयातील एक भाग आम्हाला वापरायला दिला तर कुठे बिघडले,’ असेही त्यांनी ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले होते.

गेल्या महिन्यात बच्चू कडू यांनी १८ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली की, जनता दलाचे बंद असलेले कार्यालय आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाला देण्यात यावे. मात्र जनता दल कार्यालय बंद आहे ही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल आहे. खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाने हे कार्यालय कायमस्वरूपी कार्यरत असल्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देऊनही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी आदेश काढून २३ऑगस्ट रोजी या कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती पक्षाला परस्पर बहाल करून टाकली. अशी माहिती जनता दलाचे प्रभारी राज्य अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली याबाबत शेवाळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा 

आमदार, खासदार नसलेल्या पक्षाने कार्यालयासाठी दावा का करावा? आमदार बच्चू कडू यांचा सवाल
चांद्रयानाचा आणि इव्हीएमच्या बटनाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले म्हणाले ?
ब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार येणार भारतात

कडू यांची बातमी वाऱ्यासारखी वायरल झाल्यावर जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार शरद पाटील यांनी तातडीने या वृत्ताची दाखल घेतली. ‘ आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेला समाजवादी विचारांचा पक्ष आहे. या पक्षाचे आजही कर्नाटक, केरळमध्ये मोठे स्थान आहे,’ असे सांगून कडू यांना चिमटा काढला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी