30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयकुणबी आणि मराठे एकच? जरांगे पाटलांचा आकडेवारीसह दावा

कुणबी आणि मराठे एकच? जरांगे पाटलांचा आकडेवारीसह दावा

गेल्या काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी तसेच मराठा समाजाला कुणबी समाजाचे जातप्रमाणपत्र मिळावे या उद्देशाने आंदोलन केले होते. तेव्हापासुन जरांगे पाटील हे जनतेच्या अधिक जवळ पोहोचले आहेत. आंदोलन सुरु असताना सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. मात्र सरकार यावर कोणतीही भूमिका घेत नाही. आंदोलनाला 40 दिवस झाले असुनही सरकार यावर कोणताही तोडगा काढताना दिसत नाही. यामुळे आता जरांगे पाटील गावोगावी जाऊन लोकांना जागरुक करत आहेत. त्यांनी गावाचा कानाकोपरा पिंजुन काढायला सुरुवात केली आहे.

सरकारने काही दिवसांपासुन दिलेले आश्वासन हे पुर्ण केले नसल्याने आता जरांगे पाटील रात्री 1 म्हणू नका की 2 म्हणू नका त्यांनी ग्रामीण भागात जाऊन सभा घ्यायला सुरुवात केली आहे. काल रात्री ते अहमदमनगरच्या एमआयडीसीत गेले होते. या सभेला अधिकाधीक महिलांची गर्दी पाहायला मिळत होती. यावेळी त्यांनी मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे पाच हजार पुरावे आहेत. तर यावर आता सरकारला आदेश द्यावा लागणार आहे. असे मोठे विधान जरांगे पाटलांनी केलं आहे.

हेही वाचा

…आणि आमदार जितेंद्र आव्हाडांचा रुबाब वाढला

…तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील; छगन भुजबळांचं जाहीर वक्तव्य

भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार, नाशिकमधील होर्डिंग्जवर यशवंतराव चव्हाणांचे फोटो

तर माघार नाही

40 दिवस होेऊन गेले तरीही सरकार पाऊल उचलत नाही. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे. 40 दिवस सरकारला वेळ दिला असुन लवकरात लवकर 40 दिवसात सरकारने आरक्षण द्यावे. नाहीतर माघार घेणार नाही. असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. तर कालपासुन मराठवाड्यात याबाबत बैठका सुरु झाल्या आहेत. सरकार आमच्या मागण्यानुसार काम करत आहे. असे जरांगे म्हणाले आहेत.

तर याद राखा 

मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत सरकार अनेक वर्षांपासुन दिशाभुल करत आहे. मात्र याद राखा दोन्हीही समाज जर एकत्र आले तर काय होईल. असे वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं आहे. या आरक्षणाला ओबीसी नेत्यांकडुन वारंवार नकार येत आहे. यावेळी त्यांचा रोश हा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी