25 C
Mumbai
Thursday, February 15, 2024
Homeजागतिकइस्रायल-पॅलेस्टिनींमुळे जगावर युद्धाचे संकट, तर कॅनडा-इराणमध्ये जल्लोष

इस्रायल-पॅलेस्टिनींमुळे जगावर युद्धाचे संकट, तर कॅनडा-इराणमध्ये जल्लोष

रशिया-युक्रेन युद्धाला अजून पूर्णविराम मिळालेला नसताना आता इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध भडकल्याने जगावर युद्धाच्या चिंतेचे सावट आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल (7 ऑक्टोबर) पहाटे पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या दिशेने तब्बल पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इस्रायल गोंधळून गेला. त्यानंतर लगेचच सावरून हमामविरुद्ध युद्धाची घोषणा केली. असे असले तरी इस्रायलची अभेद्य सुरक्षा यंत्रणा हमासने भेदल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर क्षमता नसतानाही अवघ्या 20 मिनिटांत हमासकडून 5 हजारांहून रॉकेटचा हल्ला इस्रायल करण्यात आला. याचाच अर्थ हमासला काही सामर्थ्यवान देशांचं इस्रायलविरोधात पाठबळ मिळत असल्याचेही संकेत आहेत.

हमासने कालपासून सुरू केलेल्या हल्ल्यात इस्रायलचे 300 सैनिक मारल्याचा आणि एक हजार लोक जखमी केल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर इस्रायलच्या अनेक सैनिकांना आणि नागरिकांना बंदी बनवल्याचा दावाही हमासकडून करण्यात येत आहे. तर हमासच्या अडीचशेहून अधिक लोकांना कंठस्नान घातल्याचा आणि 1700 लोकांना जखमी केल्याचा दावा इस्रायलकडून केला जात आहे. दरम्यान, हमासकडून हल्ला करताना मुले, महिला, वृद्ध यांचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यायाहू यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युद्ध भडकल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आज तातडीची बैठक बोलावली आहे.

हेही वाचा 

इस्रायल-पॅलेस्टिनींमध्ये युद्धचा भडका, हमासच्या हल्ल्याला इस्रायलकडून प्रत्युत्तर

…आणि आमदार जितेंद्र आव्हाडांचा रुबाब वाढला

…तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील; छगन भुजबळांचं जाहीर वक्तव्य

हमासच्या पाठीशी कोणते देश?

इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर कॅनडा, जर्मनीच्या बर्लिनमध्ये तसेच इराणमध्ये जल्लोष केला गेला. हमासकडे एवढी ताकद नसतानाही इस्रायलवर कुणाच्या पाठिंब्याने हल्ला केला, याची चर्चा जगात सुरू असताना कॅनडा, जर्मनी तसेच इराणमधील समर्थनाच्या जल्लोषाचे वेगळे अर्थ निघत आहेत. त्याचवेळी हमासप्रमुख इस्माईल हनियेत यांनी अरब आणि इस्लामिक देशांनी हमासला पाठबळ द्यावे, असे आवाहन केले आहे. गंभीर बाब म्हणजे खालिस्तान चळवळीवरून भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेलेले असतानाच आता इस्रायलवरील हल्ल्यानंतर कॅनडात जल्लोष केला गेला. त्यामुळे जगातील फुटीरतावादी चळवळींना प्रोत्साहन देण्याचे काम कॅनडात होत असल्याची चर्चा आहे.

इस्रायलमधील किती भारतीय सुरक्षित?

गाझा पट्टीतून हमासने हल्ला केल्यानंतर भारतीयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या आवाहनांचे पालन करण्याच्या सूचना भारतीय दूतावासाने भारतीयांना दिल्या आहेत. आतापर्यंत इस्रायलमधील सर्व भारतीय सुरक्षित असल्याही माहिती मिळत आहे. दरम्यान, भारताने इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध करून इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. काल पॅलेस्टिनींनी एसयूव्ही, मोटरसायकल आणि पॅराग्लायडरमधून इस्रायलमध्ये घुसखोरी करत नागरिकांवर बेधुंद गोळीबार केला. हमासने या हल्ल्याला ‘अल-अक्स स्टॉर्म ऑपरेशन’ असे नाव दिले आहे. तर इस्रायलच्या सैन्यानेही हमासला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायल सैन्याने ‘आयर्न स्वोर्ड ऑपरेशन’ असे या मोहिमेचे नामकरण केले आहे. गाझा पट्टीमध्ये 2007 मध्ये हमासची सत्ता आली. तेव्हापासून पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी