31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयअजित पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना जयंत पाटलांनी दिले चोख प्रतिउत्तर

अजित पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना जयंत पाटलांनी दिले चोख प्रतिउत्तर

टीम लय भारी

मुंबई :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे (BJP state president Chandrakant Patil criticism of Ajit Pawar has been answered by NCP state president Janyat Patil).  

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका (Chandrakant Patil sharply criticizes Ajit Pawar) करताना त्यांनी एकतर राजधानी पुण्यात हलवून इथून कामकाज करावे किंवा पुण्याचे पालकमंत्री तरी बदलावेत, अशी टीका केली होती. दरम्यान जयंत पाटील (Janyat Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या कामाचे कौतुक करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे (Praising Ajit Pawar’s work, Chandrakant Patil has been criticized).

“अजित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे (Ajit Pawar is responsible for the state). राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम अजित पवार करत आहेत. पुण्यावरही अजित पवारांचे लक्ष आहे. काही प्रश्न निर्माण झाला तर अजित पवार उपलब्ध असतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. अजित पवारांनी पुण्यात येऊन अनेकदा बैठक घेतली आहे. पिंपरीत जाऊन पाहणीही केली आहे. काहीतरी बोलायचे म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात (Chandrakant Patil is talking to say something),” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे सत्या नाडेला, सुंदर पिचाई हळहळले; मायक्रोसॉफ्ट-गुगल मदतीसाठी पुढे सरसावले

पाकिस्तानातून भारतासाठी शोएब मलिकची प्रार्थना,‘अल्लाह भारतीयांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी बळ दे..!’

“अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनाच त्यांच्या पक्षाचे किती लोक भेटले त्यांना माहिती नसल्याचे म्हटले आहे (Ajit Pawar has said that he did not know how many people from his party met Chandrakant Patil). चंद्रकांत पाटील कोल्हापुरचे असून पुण्यात येऊन उभे राहिलेत. पुण्यातल्या लोकांनी निवडून दिल्याने पुण्यातल्या लोकांसाठी काहीतरी करत असल्याचे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतील आणि त्याच्यासाठी अजित पवारांवर टीका करत असतील तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले आहेत.

‘People are dropping dead like flies’: In Uttar Pradesh villages, Covid-19 turns silent killer

“अजित पवार किती झपाट्याने, वेगाने आणि कशा पद्दतीने काम करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे (Maharashtra knows how fast, how fast and how Ajit Pawar works),” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. “स्थानिक सरकार जनतेच्या बाजूने उभे राहून लसची, रेमडेसिवीरची मागणी करत असेल तर त्याच्यात श्रेयवाद नाही,” असे सांगत त्यांनी विरोधकांना चोख प्रतिउत्तर दिले.

 

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी