27 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरराजकीयनवल : ‘इस्रायलमध्येही विकृत जितेंद्र आव्हाड !’

नवल : ‘इस्रायलमध्येही विकृत जितेंद्र आव्हाड !’

अनंत करमुसे प्रकरण सोशल मीडियातील वादंगातूनच निर्माण झाले होते. नुकतेच एका महिलेने आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा किती खरा किती खोटा यावरून सुद्धा चांगलेच वातावरण पेटले होते. अशातच आता ‘काश्मिर फाईल्स’ या चित्रपटावरून नवे वादंग सुरू झाले आहे.

माजी गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आक्रमक म्हणून ओळखले जातात. ते कट्टर पुरोगामी विचारांचे आहेत. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्ववादी विचारांवर ते आक्रमक बोलत असतात. त्यांच्या आक्रमकपणामुळे हिंदुत्वाच्या समर्थकांबरोबर त्यांची सतत भिडंत होत असते. सोशल मीडियात जिंतेद्र आव्हाड व हिंदुत्ववादी यांच्यातील फटकेबाजी सतत पाहायला मिळत असते. अनंत करमुसे प्रकरण सोशल मीडियातील वादंगातूनच निर्माण झाले होते. नुकतेच एका महिलेने आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा किती खरा किती खोटा यावरून सुद्धा चांगलेच वातावरण पेटले होते. अशातच आता ‘काश्मिर फाईल्स’ या चित्रपटावरून नवे वादंग सुरू झाले आहे.

‘इफ्फी’ या चित्रपट महोत्सवाचे गोव्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटांना पुरस्कार देण्यासाठी नेमण्यात आलेल्या ज्युरी बोर्डाचे प्रमुख असणाऱ्या नवाद लॅपिड याने द काश्मिर फाईल्स चित्रपटाचा इफ्फी पुरस्कार सोहळ्यात समावेश करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी त्याने काश्मिर फआईल्स हा चित्रपट धार्मिक तेढ निर्माण करणारा आणि एका धर्माचा प्रचार करणारा चित्रपट आहे असे वादग्रस्त विधान केलं होतं. यावर पुन्हा एकदा वादविवादाचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यानी याप्रकरणावर भाष्य करताना ‘द काश्मिर भाईल्स चित्रपट अश्लील असल्याचे आंम्ही पहिल्यापासूनच बोलतोय’ अशी टिका केली. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे.

हे सुद्धा वाचा

RBI लाँच करणार डिजिटल चलनाचा पायलट प्रोजेक्ट

भारतीय संघासमोर बांग्लादेश गारद !, पहिल्याच दिवशी जयस्वालची खेळी यशस्वी

चांगली झोप मिळण्यासाठी योग्य स्थिती काय आहे माहितीये का ?, जाणून घ्या एका क्लिकवर

काश्मीर फाइल्स वर अश्लीलतेचा आरोप करणारे इफ्फीचे यावर्षीचे मुख्य ज्युरी नदव लॅपिड हे विकृत मानसिकतेचे म्हणून त्यांच्या देशात, इस्रायलमध्ये ओळखले जातात. थोडक्यात म्हणजे, ते इस्रायल मधले जितेंद्र आव्हाड आहेत. असे खोचक ट्विट शेअर करत अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. भातखळकरांच्या या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर भाजप समर्थक विरुद्ध राष्ट्रवादी समर्थक यांच्यात कलगीतुरा रंगला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नवद लॅपिड याने केलेल्या टिकेनंतर द काश्मिर फाईल्समधील अभिनेते अनुपम खैर, चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इस्रायल देशाच्या राजदूतांनी घडलेल्या घटनांवरून अनुपम खैर आणि इतर संपूर्ण चित्रपटाच्या टीमची माफी मागितली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी