28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय...10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली; जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

…10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली; जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी रविवारी (दि.16) रोजी आणि मंत्र्यांसह आमदारांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. अशातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक सुचक ट्विट करत राजकारणात संयमाला किती महत्त्व असते हे शरद पवारांकडून शिकावे असे म्हणत कोणाची विकेट कधी गेली हे विकेट गेलेल्या माणसाला कळत नाही. १५ दिवसानंतर त्याची जाणिव होते असे म्हणत आव्हाडांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात सभा घेऊन यापुढे देखील आपण रायकीय लढ्यासाठी शड्डू ठोकून आहोत असाच संदेश दिला. खरेतर अजित पवार गटातील आमदारांचा शपथविधी, सरकारमध्ये खातेवाटप झाले तरी त्यांच्या गटाकडे नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झालेले नाही. अशातच रविवारी (दि16) रोजी अजित पवारांसह त्यांच्या गटाचे मंत्री आणि आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदारांनी शदर पवार यांची भेट घेतली.

शरद पवार यांनी पक्ष एकसंध रहावा यासाठी मार्ग काढावा असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे शरद पवार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शरद पवार यांच्या भेटीमुळे अजित पवार गटामध्ये धाकधूक असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाच्या आमदारांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर संताप व्यक्त केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी देखील आपल्या भूमिकेवर ठाम राहत अजित पवार गटाला सपशेलपणे दुर्लक्षित केले आहे. काही दिवसांपूर्वी पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करणारे, शरद पवार यांनी निवृत्त व्हावे अशी भूमिका मांडणाऱ्या अजित पवार गटाला आता शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हवे आहेत. पक्ष एकसंध रहावा यासाठी शरद पवार यांनी मार्ग काढावा अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान याच उलथापालथी दरम्यान राष्ट्रवादी पवार गटाचे पक्ष प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. ”पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज… शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी आणि राजकारणात संयमाला किती महत्व आहे हे कोणाकडून शिकावं; एकच नाव शरद पवार ! कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही. 10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली.” असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 
भूमाफियांनी शेकडो हेक्टर कांदळवन तो़डल्यावर ठाणे जिल्हा प्रशासनाला जाग; कांदळवनासाठी टोल फ्री क्रमांक
प्रणिता थोरातला उच्च शिक्षणासाठी जर्मन सरकारची फेलोशिप; जातीयता व लिंगभेदावर करणार संशोधन
विधान सभेत शरद पवार गटातील फक्त 8 आमदार दिसले, व्हीप नेमका कुणाचा मानायचा? आमदारांना प्रश्न

त्यामुळे शरद पवार यांचे राजकाण कळणे कोणाला वाटते तितके सोपे नाही असेच आव्हाड यांनी म्हटल्याचे दिसते. पवार हे पुरोगामी महाराष्ट्राचा आवाज आहेत. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी