27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयचांद्रयानाचा आणि इव्हीएमच्या बटनाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले म्हणाले ?

चांद्रयानाचा आणि इव्हीएमच्या बटनाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले म्हणाले ?

मत नोटाला द्या, हाताला (Congress) द्या अथवा कार (BRS) ला द्या अथवा कोणाला ही द्या मात्र जिंकणार कमळच (BJP) असे खळबळजनक विधान तेलंगानातील भाजपचे खासदार डी. अरविंद यानी नुकतेच एका पत्रकार परिषदेत केले होते. त्यावर वादंग सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले असून EVM मशीनबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नुकतेच भारताचे चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वीपणे उतरले, चाचच दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे, भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं गेलं. आणि त्यात यशस्वी देखिल झाले. मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं. विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे.


गेल्या काही वर्षांपासून देशात EVM बद्दल शंका उपस्थित केली जात आहे. भाजप इव्हिएमचा वापर करुन सत्तेत येत अल्याचा आरोप देखील अनेकदा विरोधकांकडून केला जात आहे. आता देखील जितेंद्र आव्हाड य़ांनी इव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली आहे. जर बटन दाबून चंद्रयान चंद्रावर उतरु शकते तर इव्हीएम भाजपला मतदान करु शकते असा तर्क आव्हाड यांनी मांडला आहे.

हे सुद्धा वाचा 

शिंदे गटाच्या आमदाराला बक्कळ निधी मिळाला, पण तालुक्याला पाणी मिळेना; शेतकरी वैतागले

ब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार येणार भारतात

उज्ज्वला गलांडे-पाटील मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०२३ मध्ये उपविजेत्या

इव्हीएम मशीनबद्दल सर्वोच्च न्यायालयात देखील अनेकांनी याचिका दाखल केल्या आहेत. तर मतादान प्रक्रीयेतून इव्हीएम मशीन बंद करुन कागदावर मतदान घ्यावे अशी देखील मागणी केली जाते. इव्हीएममध्ये पारदर्शकता नसल्याने, त्यात छेडछाडीची शक्यता असल्याने वारंवार याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. काल परवा खासदार डी. अरविंद यांनी केलेल्या खळबळजनक विधाना नंतर इव्हीएमबाबत देशभरात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी