32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीय'शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा'

‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा’

प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर आयोध्येमध्ये बांधण्यात आलं आहे. या मंदिरामध्ये (Ram mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. अशातच आता राम मंदिराचा हा मुद्दा सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजतही आहे. सुरूवातील राम लल्लाच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापणेसाठी काही राजकीय नेत्यांना निमंत्रण न देण्याचं सांगितलं गेलं आहे. तसेच विरोधकांनी राम मंदिर हे राजकीय हेतूपोटी बांधण्यात आलं असल्याच्या टीका केल्या आहेत. अशातच आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून एक ताजी माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामाबद्दल शिर्डीच्या सभेमध्ये वक्तव्य केलं आहे. यामुळे आता भाजपचे नेते जितेंद्र आव्हाडांवर चांगलेच संतापले आहेत.

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक सभा झाली होती. त्यासभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल वक्तव्य केलं होतं. श्रीराम हे मांसाहारी आहेत, ते बहुजनांचे आहेत, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं. यावर आता भाजपचे अनेक नेते संतापले आहेत. भाजप नेते राम कदम हे घाटकोपर येथे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हणाले आहेत. काही ठिकाणी आव्हाडांविरोधात आंदोलनही केलं आहे. राम कदम यांनी आव्हाडांवर टीकेची तोफ डागली आहे.

हे ही वाचा

“मी मृत झालो होतो, मात्र…” हार्ट अटॅकमधून सावरत असलेल्या श्रेयस तळपदेने सांगितली ‘त्या’ दिवसाची आपबिती

चंद्रकांत पाटील यांनी नवीन इमारती आणि वसतीगृहांच्या बांधकामांसाठी केली भरगच्च निधीची घोषणा

सिराजने द. आफ्रिकन खेळाडूंना केलं चारही मुंड्या चित

काय म्हणाले राम कदम?

‘राम हे मांसाहरी होते तर आव्हाडांनी त्याचा पुरावा द्यावा, डर पुरावा नसेल तर त्यांनी राम भक्तांची माफी मागावी, देशामध्ये आता राम मंदिर उभारत आहे तर यांच्या पोटामध्ये दुखत आहे’, असं वक्तव्य राम कदम यांनी केलं आहे. आव्हाडांना अटक करा अशा देखील मागणी राम कदम यांनी केली असल्याचं राम कदम म्हणाले आहेत.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राम हा शाहकारी नव्हता तो मांसाहारी होता, कारण १४ वर्षे वनवास केलेला कोणी कसा शाकाहारी राहू शकेल असं वक्तव्य आता जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आपण अनेकदा राजकारणात वाहून जातो. आपण इतिहास वाचत नाही. राम हा मांसाहरी आहे, राम हा बहुजनांचा आहे. शिकारकरून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवायचा. १४ वर्षे वनवास केलेला राम कसा काय शाकाहारी असेल, असा दावा आता जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी