24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीय'आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत'

‘आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत’

आयोध्येमध्ये (Aayodhya) होणाऱ्या राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा येत्या २२ जानेवारी दिवशी होणार आहे. यामुळे आता आयोध्येत उभारलेले राम मंदिर हा चर्चेचा विषय आहे. प्रभू श्रीरामाच्या (prabhu shree ram) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक दिवसांपासून भक्त वाट पाहत आहेत. यामुळे श्रीरामाचा मुद्दा सर्वाधिक उपस्थित होत आहे. मात्र अशातच यामुद्द्याला राजकीय रंग प्राप्त होऊ लागला आहे. सुरूवातीला रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काही राजकीय नेत्यांना निमंत्रण न दिल्याने या मुद्द्याला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम हा बहुजनांचा मांसाहारी असल्याचं वक्तव्य शिर्डीच्या सभेमध्ये असताना केलं होतं. यावेळी त्यांनी रामायणाच्या इतिहासाची तुलना सध्याच्या राजकारणासोबत करत रामाच्या वनवासाचे उदाहरण देत ‘अजित पवार (ajit pawar) हे आपल्या काकाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाले आहेत’, अशी पोस्ट ‘x’ ट्विटरवर आव्हाडांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

‘माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला’.

हे ही वाचा

‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा’

“मी मृत झालो होतो, मात्र…” हार्ट अटॅकमधून सावरत असलेल्या श्रेयस तळपदेने सांगितली ‘त्या’ दिवसाची आपबिती

सिराजने द. आफ्रिकन खेळाडूंना केलं चारही मुंड्या चित

‘आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत’

‘आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही. तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवत आहेत’.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी