31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeक्रीडासिराजने द. आफ्रिकन खेळाडूंना केलं चारही मुंड्या चित

सिराजने द. आफ्रिकन खेळाडूंना केलं चारही मुंड्या चित

दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या टीम इंडियासोबत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यामध्ये द. आफ्रिकेने टीम इंडियाला पळता भुई थोडी करून सोडलं होतं. यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला होता. दरम्यान आता द. आफ्रिका आणि टीम इंडिया संघामध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी द.आफ्रिकेच्या फलंदाजांविरोधात केपटाऊनच्या न्यूलॅंड्स मैदानावर टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने द.आफ्रिका संघाची दैनी अवस्था केली आहे. त्याने तब्बल ६ विकेट्स घेत विजयाचं झुकतं माप आपल्याच बाजूनं वळवलं आहे.

दक्षिण अफ्रिकेचा कर्णाधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकूण सर्वप्रथम फलंदाजी स्विकारली आहे. टीम इंडियाकडे गोलंदाजीची जबाबदारी आली. मात्र सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने देखणी कामगिरी केली आहे. त्याने केवळ १५ धावांमध्ये ६ गडी बाद केले आहेत. याचा फयदा आता दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला होतो. पहिला कसोटी सामना द. आफ्रिकाने जिंकला असून आता दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये द.आफ्रिकेची सुरूवात खराब झाली आहे. यामुळे आता द.आफ्रिकेच्या बाजूने चिंतेचे डोहाळे लागले आहेत. सिराजच्या गोलंदाजीने द.आफ्रिकेविरूद्ध नवीन विक्रम केला आहे. त्याने अनेक गोलंदाजांना मागे टाकलं आहे.

हे ही वाचा

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री

मनोज जरांगेंच्या कुटुंबात कुणबी प्रमाणपत्र नाही

शाहरूख खानने २०२३ मध्ये केला ‘हा’ विक्रम

सिराजचा नवीन विक्रम

मोहम्मद सिराजने १५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. द.आफ्रिकेतील यजमान संघाला घाम फोडला आहे. कमी धावांमध्ये सर्वाधिक विकेटंस घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने माजी खेळाडू जवागल श्रीनाथ, हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने सध्या खेळत असलेल्या शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा यांना देखील मागं टाकलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी