31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रBalasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार-...

Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीकडून राज्यातील पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. मात्र, आघाडीच्या पक्षांकडून उमेदवार देणे बाकी आहे. त्यातच, या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे, पुण्यासह राज्यातील इतर पक्षांतही आघाडीचा उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे. त्यातच, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरणार असल्याचे बाळासाहेब थोरात सांगितले. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

एकाच जिल्ह्यात दोघांना उमेदवारी

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपने सांगली जिल्ह्यातील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी