27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयशांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचा विजय अवघड : अभिजित पानसे

शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचा विजय अवघड : अभिजित पानसे

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शांतिगिरी महाराज यांच्यामुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली असून, असे असले तरी मनसे तुमच्या पाठीशी आहे. शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढविली नसती तर महायुतीचा विजय अधिक सोपा झाला असता असा दावा मनसेचे लोकसभेचे मुख्य समन्वयक अभिजित पानसे यांनी केला. शनिवारी (दि.११) मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा मनोहर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पानसे बोलत होते. यावेळी पानसे म्हणाले, महायुतीसाठी २० मेपर्यंत असे काम करा की पुन्हा त्यांनी तुम्हाला मान दिला पाहिजे.

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शांतिगिरी महाराज(Shantigiri Maharaj) यांच्यामुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली असून, असे असले तरी मनसे तुमच्या पाठीशी आहे. शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) निवडणूक लढविली नसती तर महायुतीचा विजय अधिक सोपा झाला असता असा दावा मनसेचे लोकसभेचे मुख्य समन्वयक अभिजित पानसे ( Abhijit Panse) यांनी केला. शनिवारी (दि.११) मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा मनोहर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पानसे  बोलत होते. यावेळी पानसे  म्हणाले, महायुतीसाठी २० मे पर्यंत असे काम करा की पुन्हा त्यांनी तुम्हाला मान दिला पाहिजे. (Mahayuti’s victory difficult because of Shantigiri Maharaj: Abhijit Panse )

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी जाहीर केले की मोदींना पाठिंबा म्हणून मनसे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करतील. परंतु तुम्ही शिंदेसेना-भाजपचे कार्यकर्ते नाहीत हे लक्षात ठेवा. आपण इतर नेत्यांपेक्षा मोठे आहोत. त्यामुळे आपणच आपल्या माणसांचा मान ठेवा. मोदी निवडून आले तर संविधान बदल होईल ही उगीच अफवा पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आभार नामदेव पाटील यांनी मानले.

अमित ठाकरे यांची अनुपस्थिती
मनसेच्या मेळाव्याला अमित ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. परंतु, मुंबई येथे आगामी दोन टप्प्यांतील निवडणुकांची राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक असल्याने अमित ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत असे अभिजित पानसे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी