28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशरद पवारांना थप्पड मारणाऱ्या माथेफिरूला 8 वर्षानंतर अटक

शरद पवारांना थप्पड मारणाऱ्या माथेफिरूला 8 वर्षानंतर अटक

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व तत्कालिन कृषी मंत्री शरद पवार यांना आठ वर्षांपूर्वी एका माथेफिरूने थप्पड मारली होती. त्यानंतर तो फरार होता. परंतु दिल्ली पोलिसांनी त्याला अखेर आज अटक केली आहे. अरविंदर सिंह ऊर्फ हरविंदर सिंह असे या आरोपीचे नाव आहे.

नवी दिल्लीत सन 2011 मध्ये एका जाहीर कार्यक्रमात अरविंदर सिंह याने पवार यांना थप्पड मारली होती. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. पण तो पोलिसांना सापडत नव्हता. सन 2014 मध्ये न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर आज तो अखेर पोलिसांच्या हाती सापडला. हरविंदर सिंहला पकडल्यामुळे पोलिसांनी सुटकेच्या निश्वास टाकला आहे. अरविंदर सिंह याने माजी दुरसंचार मंत्री सुखराम यांनाही थप्पड मारली होती.

शरद पवार यांच्या प्रकरणात पोलिसांनी अरविंदर सिंह याचा बराच शोध घेतला होता. त्याच्या घरी अनेकदा भेटी दिल्या होत्या. पण तो अज्ञात ठिकाणी राहण्यास गेला होता. आज तो दिल्लीत एका ठिकाणी येणार असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्या आधारे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियात भाजप, शिवसेनेला टपल्या; तर शरद पवारांचे कौतुक

… आणि शरद पवारांनी आमदारांचा हट्ट पुरवला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी