29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयआमदार प्रकाश आवाडे यांना पराभवाचा धक्का

आमदार प्रकाश आवाडे यांना पराभवाचा धक्का

टीम लय भारी

कोल्हापूर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागरी बँका आणि पतसंस्था गटात प्रा. अर्जुन आबिटकर यांनी विजय मिळवला. कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे. याआधी ६ जागा बिनविरोध आणि आता मतदानानंतर त्यांच्या ६ जागा निवडून आल्या आहेत.( MLA Prakash Awade to Defeat)

अनिल पाटील यांनी मागील निवडणूक भाजपकडून लढवली होती. यावेळी त्यांनी सत्तारुढ आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती, पण आवाडे यांच्या एन्ट्रीमुळे अनिल पाटील यांचा पत्ता कट झाला होता.त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यांच्या उमेदवारीचा फटकाही काही प्रमाणात आवाडे यांना बसल्याचे दिसत आहे.

धनंजय मुंडे यांची मोठी कामगिरी, गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरू केलेल्या योजनेसाठी आणला निधी

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजप पदाधिकारी जितेन गजारियाला अटक

राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीकडून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व खा. संजय मंडलिक रिंगणात होते. आसुर्लेकर यांना आ. विनय कोरे यांनी थेट विरोध होता.  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( KDCC Bank Election Result) 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आलेला आहे. यामध्ये सत्ताधारी गटान खातं उघडलं आहे. आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे.  तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे देखील विजयी झाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची नेमकी खंत काय?

KDCC banks elections: NCP’s Mushrif gets elected unopposed

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी