31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हेच होणार, मनसे आमदार राजू पाटील झाले...

ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हेच होणार, मनसे आमदार राजू पाटील झाले संतप्त

टीम लय भारी

कल्याण : मनसेचे आमदार राजू पाटील हे कल्याणमधील रस्त्यांवरचे साम्राज्य पाहून संतप्त झाले आहेत. कल्याणच्या मलंग रस्त्यासाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरी सुद्धा या रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही. ज्या कंपनीला या रस्त्यासाठी कंत्राट दिले होते ती कंपनी मुबंईत ब्लॅकलिस्टमध्ये आहे, असे विधान पाटील यांनी केले आहे (MNS MLA Raju Patil got angry over the road potholes).

या रस्त्याच्या कामासाठी ९५ प्रतिशत बिल कंत्राट कंपनीला आधीच देण्यात आले होते. रेलकॉन कंपनीला हे काम दिले असून ती ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. त्यामुळे ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हीच परिस्थिती होणार, असे म्हणत राजू पाटील यांनी रस्त्याच्या खड्यांवरून टीका केली आहे. मलंग रस्त्याचीच नव्हे तर, संपूर्ण कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यांची परिस्थिती ही अत्यंत खराब आहे.

खड्ड्यांचे फोटो वॅाट्सअप करा आम्ही होऊ तुमचे माध्यम म्हणत, केले भाजप आमदारांनी नागरीकांना आव्हान

ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई, चार अभियंत्यांना केले निलंबित

त्यामुळे पालकमंत्र्यांनी वेळ काढून येथील रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. राजू पाटील यांनी कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी नगरसेवक कुणाल पाटील, हरीश जोशी, कंत्राटदार कंपनीचे अभियंता अरुण पाटील आणि महेश गुप्ते हे देखील उपस्थित होते.

सरपंच परिषदेचे मोठे यश, 72000 प्रति वर्ष वाचले

Maharashtra: BJP, MNS reach ‘seat adjustment’ for Palghar ZP, Panchayat Samiti bypolls

राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांना रस्त्यांच्या खड्यांवरून धारेवर धरले आहे. स्वतः पालकमंत्र्यांनी कल्याणमध्ये येऊन रस्त्यांची पाहणी करावी असे वक्तव्य राजू पाटील यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी