28 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयसुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील दुपारी राज्यपालांना भेटणार, सत्ता स्थापनेच्या हालचाली

सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील दुपारी राज्यपालांना भेटणार, सत्ता स्थापनेच्या हालचाली

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेच्या दिशेने आता हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज दुपारी 2 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत. या भेटीत राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने राजकीय चर्चा होईल असे मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. या जनादेशाचे पालन व्हावे अशी भाजपने पहिल्या दिवसापासूनच आग्रही भूमिका मांडली आहे. त्या दृष्टीने आता महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचे प्रत्येक पाऊल पडेल. या शिवाय दुसरा कोणताच विचार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना आपल्या आमदारांना ठेवणार ‘लपवून’

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देतील : संजय राऊत

मुनगंटीवार व पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते लगेचच 2.30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज सकाळी 11 वाजता सर्व सेना आमदारांसोबत बैठक आयोजित केली आहे. ठाकरे यांची आमदारांसोबतची चर्चा आणि मुनगंटीवार – पाटील यांची राज्यपालांसोबतची भेट या दोन्ही घडामोडीनंतरच सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी