31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी शनिवारी सत्तास्थापन करणार : नवाब मलिक

महाविकास आघाडी शनिवारी सत्तास्थापन करणार : नवाब मलिक

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येणार आहे. पाच वर्ष स्थिर आणि पर्यायी सरकार देण्यावर तिन्ही पक्षाचा भर असून आम्ही उद्या शनिवारी सत्तास्थापनेचा दावा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

राज्याचा आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतलं जाणार आहे का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी तिन्ही पक्षांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार पाच वर्ष चालावं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांच्या भावनेचा सन्मान झाला पाहिजे. लवकरात लवकर सरकार स्थापन करणं याला आमचं सर्वाधिक प्राधान्य आहे, असंही ते म्हणाले. यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या महाविकास आघाडीकडं लागलं आहे.

आज तिन्ही पक्षांची मॅरेथान बैठक वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये झाली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनिया गांधीचे सल्लागार अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल व इतर नेते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी